काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळातच चढ्या दराने निविदा - मोहोळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता असताना अनेक कामांच्या निविदा चढ्या दराने मंजूर झाल्या. मात्र, गेल्या तीन वर्षांत ज्या प्रकल्पांच्या निविदा फुगल्याचे आढळून आले, तेव्हाच पुढाकार घेऊन आम्ही त्या रद्द केल्या. त्यामुळे पुणेकरांचे पैसे भाजपमुळे वाचले आहेत, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी सांगितले.

पुणे - महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता असताना अनेक कामांच्या निविदा चढ्या दराने मंजूर झाल्या. मात्र, गेल्या तीन वर्षांत ज्या प्रकल्पांच्या निविदा फुगल्याचे आढळून आले, तेव्हाच पुढाकार घेऊन आम्ही त्या रद्द केल्या. त्यामुळे पुणेकरांचे पैसे भाजपमुळे वाचले आहेत, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी सांगितले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नियोजित समान पाणीपुरवठा योजना, ‘एचसीएमटीआर’ ‘जायका’, कात्रज-कोंढवा रस्ता आणि जलपर्णीच्या फुगविलेल्या निविदा रद्द झाल्या. त्यामुळे पुणेकरांचे सुमारे साडेचार हजार कोटी वाचल्याचे ‘सकाळ’ने उघड केले. त्यामुळे या प्रकल्पांच्या सुमारे दहा हजार कोटींच्या निविदांची चौकशीच्या हालचाली नवे सरकार करीत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने शनिवारी प्रसिद्ध केले होते. त्यावर या प्रकरणांची गांभीर्याने चौकशी करू, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर महापौर मोहोळ यांनी भूमिका मांडली.
मोहोळ म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने ३५ टक्के जादा दराने आलेल्या निविदा मंजूर केल्या होत्या.

साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल!

त्या आम्ही रद्द केल्या. समान पाणीपुरवठा योजनेची पहिली निविदा त्यांच्याच काळात काढली होती. उलटपक्षी चढ्या दराच्या निविदा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काळातील निविदांची चौकशी सरकारने करावी.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tender at high rates during Congress and NCP