पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल!

ज्ञानेश सावंत
शनिवार, 14 डिसेंबर 2019

- फुगलेल्या निविदा रद्द झाल्याने पुणेकरांचे साडेचार हजार कोटी रुपये वाचल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध केले.

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभाऱ्यांवर जोरदार निशाणा साधताना गेल्या तीन वर्षातील प्रकल्पांच्या फुगलेल्या निविदा प्रकरणांची गांभीर्याने चौकशी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता.14) पुण्यात स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फुगलेल्या निविदा रद्द झाल्याने पुणेकरांचे साडेचार हजार कोटी रुपये वाचल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध केले. आपल्या भाषणाच्या सुरवातीला 'सकाळ'मधील वृत्त वाचून दाखवत पवार यांनी ही प्रकरणे गंभीर असल्याचेही स्पष्ट केले. 

- आता 'या' नेत्याला आमदार करणार : अजित पवार

नियोजित विशेषत: समान पाणीपुरवठा योजना, 'एचसीएमटीआर' 'जायका', कात्रज-कोंढवा रस्ता आणि जलपर्णीच्या फुगविलेल्या निविदा रद्द झाल्या. त्यामुळे पुणेकरांचे सुमारे साडेचार हजार कोटी रुपये वाचल्याचे 'सकाळ' ने उघड केले आहे.

- भाजप सरकारचा 'हा' नियम बदलण्याबाबत अजित पवारांचे सूतोवाच!

त्यामुळे या प्रकल्पांच्या सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या निविदांची चौकशी करण्याच्या हालचाली नवे सरकार करीत असल्याचे वृत्त 'सकाळ'ने शनिवारी (ता.14) प्रसिद्ध केले होते.

- 'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण करताना पहिल्यांदा 'सकाळ'मधील वृत्त वाचून दाखविले. त्यानंतर या प्रकरणांची गांभीर्याने चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

- #ForBetterPune : पुणे महानगरपालिकेत चाडेचार हजार कोटींचा भ्रष्टाचार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar pointed out the inquiry of PMC tenders worth Rs 4 crore and 50 lac rupees