खडकवासला मनोरंजन पार्कच्या निविदा येत्या सोमवारी उघडणार

dam.jpg
dam.jpg

खडकवासला : "खडकवासला येथील पाटबंधारे विभागाच्या २८ एकर जागेवर मनोरंजन पार्क उभे करण्यासाठी निविदा भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. आता निविदा 23 जुलै पर्यत स्वीकारल्या जाणार असून त्या 27 जुलै म्हणजे पुढील सोमवारी त्या उघडण्यात येणार आहेत." अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.

खडकवासला धरण परिसरात धरणाच्या उभारणी करण्यासाठी जागा ताब्यात घेतली होती. त्यातील उर्वरित जागा रिकामी आहे.  खडकवासला व कोपरे गावाच्या हद्दीतील ही जागा आहे. धरण परिसरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी ही जागा आहे. त्या वापरात नसलेल्या आणि पडून असलेल्या रिकाम्या जागेसंदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाने ही जागा मनोरंजन पार्क बांधा, वापरा व हस्तांतरण करा या बीओटी तत्वावर भाड्याने देणार आहे. त्यासाठीची निविदा १० जूनच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आली होती. निविदा २३ जूनपर्यत भरण्याची मुदत होती. २५ जून रोजी निविदा काढण्यात येणार होत्या. परंतु यातील काही इच्छुकांनी निविदा भरण्यासाठी कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार, ही काढण्याची मुदत ८ जुलै पर्यत वाढविली आहे. १० जुलैला निविदा काढल्या जाणार होत्या. त्याची पुन्हा मुदतवाढ देऊन आता 23 जुलै पर्यत स्वीकारणार आहे. आणि त्या 27 जुलै म्हणजे पुढील सोमवारी त्या काढल्या जाणार आहेत. दरम्यान, या मनोरंजन पार्क उभारण्यासाठी सुमारे 8 ते 10 जण इच्छुक आहेत. ही संख्या वाढू शकते असे ही पाटील यांनी सांगितले.

खासदार सुळेंचा पाठपुरावा : म्हैसूर येथील वृंदावन गार्डन, कृष्णराजसागर धरण, पैठणच्या नाथसागर धरणालगत बाग आहे. अशा प्रकारे खडकवासला धरणालगत बाग करणार असे असे निवडणुकी दरम्यान वचननाम्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. विधानसभा निवडणुकी नंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे बागेसाठी पाठपुरावा सुरू केला. १८ फेब्रुवारी २०२० रोजी पुन्हा पत्र पाठविले होते.
आधुनिक, सर्व सुविधा असणारे  पर्यटन केंद्र उभे केले जात आहे.

गार्डनचा प्रस्तावित आराखडा  : एकूण २८ एकरामध्ये धरणाच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत मुख्य बाग, धरणाच्या दोन्ही बाजूस रस्त्यालगत उपबागा, मुख्य बागेत अँम्युजमेंट पार्क, वस्तू संग्रहालय, आकर्षक मत्स्यदर्शन केंद्र, संगीतमय कारंजी, हॉटेल्स, रोसॉर्ट, बहुउद्देशीय सभागृह, उत्तमोत्तम फुलझाडे, वृक्षराजी, स्थानिक झाडे, वेली अशी ही बाग साकारली जाणार आहे. या बागेमुळे खडकवासला धरणालगत सर्वोत्तम भव्य पर्यटन केंद्र उभे राहणार आहे. सुमारे २५- ३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. 

पुणेकर मोठ्या संख्येने खडकवासला या परिसरात पर्यटनासाठी येत असतात. या परिसरात रस्त्यालगतच्या चौपाटी शिवाय काहीच नाही. तेथे मूलभूत सुविधा देखील नाहीत. या परिसरात पाटबंधारे विभागाची या परिसरातील रिकामी पडून असलेली २८ एकर जागा मनोरंजन पार्कसाठी बांधा, वापरा व हस्तांतरण करा या बीओटी तत्वावर 30वर्षांसाठी देत आहे. असल्यामुळे महामंडळाच्या रिकाम्या जागेचा वापर करून पाटबंधारे विभागाला उत्पन्न मिळणार आहे. तीस वर्षानंतर तो प्रकल्प महामंडळाला आहे तसा पाटबंधारे विभागाला द्यावा लागणार आहे.-विजय पाटील कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com