
Maharashtra Sahitya Parishad
Sakal
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा धक्काबुक्कीचा प्रकार शनिवारी घडला. लोकशाही मार्गाने कार्यकारी मंडळाचा निषेध करणाऱ्या सभासदाला उद्दाम भाषा वापरत आणि अक्षरशः धक्के मारत सभागृहाबाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी, याच सभेत ‘मसाप’च्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रस्ताव मंजूर झाला.