प्राधिकरण कार्यालयात बेवारस बॅगेमुळे खळबळ 

संदीप घिसे
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पुणे : प्राधिकरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेवारस बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना शनिवारी (ता. 20) दुपारी घडली. 

पुणे : प्राधिकरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेवारस बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना शनिवारी (ता. 20) दुपारी घडली. 

निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील प्राधिकरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक बेवारस बॅग असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार निगडी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत प्राधिकरण कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. बॅगेची पाहणी केल्यावर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. 

बॅगेची तपासणी केल्यावर त्यात काहीतरी धातू असल्याचा निर्वाळा देत स्फोटक नसल्याचेही सांगितले. यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केल्यावर त्या बॅगेत कागदपत्र आणि सुट्टे पैसे असल्याचे दिसून आले. आता पोलिस ही बॅग कोणाची आहे याची माहिती घेत आहेत. 

Web Title: tention due to the Uncertain Bag in pcmc office