
Bandu Andekar
Esakal
पुण्यातील आंदेकर टोळीला मुळापासून संपवण्याचा प्रण आता पुणे पोलिसांनी घेतल्याचं दिसत आहे. त्यांच्या अनाधिकृत बांधकामांवर हतोडा चालवण्यात आला, अनेक बॅनर काढून टाकण्यात आले. यामध्ये वनराज आंदेकरच्या आठवणीत लावलेले बॅनर देखील होते. वनराज आंदेकरची गेल्या वर्षी टोळी युद्धात हत्या करण्यात आली होती. या हत्येत गणेश कोमकर मुख्य आरोपी होता. आंदेकर टोळीने त्याच्या मुलाला म्हणजे आयुष कोमकरला संपवून बदला घेतला. त्यामुळे हे प्रकरण पेटलं. पण आता पोलिस या टोळी युद्धाला लगाम लावताना दिसत आहेत.