Pune: TET गैरव्यवहार, म्हाडा पेपरफुटी प्रकरणी दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

या प्रकरणाशी संबंधित आरोपीला पोलिसांनी नाशिकवरून अटक केली आहे.

TET गैरव्यवहार, म्हाडा पेपरफुटी प्रकरणी दोघांना अटक

मागील काही दिवसांपूर्वी राज्यात आरोग्य भरती परीक्षेसंदर्भात मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर परीक्षेत पेपर फुटीच्या घटनेनं खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली होती. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणात गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा परीक्षा पात्रता प्रकरणात आणखी एका सब एजंटला अटक करण्यात आली आहे. (TET-MHADA)

हेही वाचा: पेपरफुटी प्रकरणात बीडमधील आणखी एक शिक्षक ताब्यात; सायबर विभागाची कारवाई

मिळालेली माहिती अशी की, परीक्षा पात्रता प्रकरणात आणखी एका सब एजंटला अटक झाली आहे. यात शिक्षकच एजंट बनला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या एजंट शिक्षकाचे नाव मुकुंद सूर्यवंशी असं असून यामध्ये वरिष्ठ लिपिक राजेंद्र साळुंके यालाही पोलिसांनी अटक केली आहे. म्हाडा पेपरफुटी प्रकरणी राजेंद्र सोळुंके या एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. (TET Exam) परीक्षा पात्रता गैरव्यवहारात अटक केलेल्या स्वप्नील पाटील याच्याकडे चौकशी केली असता, ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रकरणाशी संबंधित राजेंद्र सोळुंकेला नाशिकवरून (Nashik) अटक केली असून 23 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने 2019 - 20 च्या परीक्षेतील यादी दिली होती.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील उध्दव प्रल्हाद नागरगोजे , प्रशांत व्यंकट बडगीर, डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे इत्यादी आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे. या सर्वांनी काही अधिकाऱ्यांना आणि परीक्षा घेणाऱ्या आयटी कंपन्यांमधील लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: पुणे : आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघे अटकेत

Web Title: Tet Mhada Exam Case Fraud Pune Again Two Agents Persons Arrested From Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top