
Engineering Admission
Sakal
पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमात आता वस्त्रोद्योगाशी संबंधित विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यावर आधारित असणाऱ्या टेक्स्टाइल अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. वस्त्रोद्योगातील अभियांत्रिकी तत्त्वे, रासायनिक प्रक्रिया आणि उत्पादन तंत्रज्ञान याबाबत अत्याधुनिक आणि काळानुरूप बदलणारे ज्ञान देणाऱ्या या अभ्यासक्रमाच्या जवळपास ९५ टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत.