Shiv Sena UBT and MNS Release Joint Manifesto
sakal
पुणे - प्रामाणिक मिळकतकर भरणाऱ्या पुणेकरांना २० टक्क्यांची सवलत, ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषध सुविधा, महिलांना मोफत पीएमपीचा प्रवास व गुन्हेगारी मुक्त पुणे करण्याचा शब्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वचननाम्याच्या रूपाने पुणेकरांना दिला.