Video : ठाकरे सरकार दोन नवे विभाग करण्याच्या तयारीत; बाळासाहेब थोरात म्हणाले...

अमोल कवितकर
रविवार, 5 जानेवारी 2020

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली, की ''नवीन विभाग करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. वाणिज्य व व्यापारासाठी आणि देवस्थान संदर्भातही नवा विभाग करण्याचा विचार सुरु आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या धर्तीवर मुख्यमंत्री कार्यालयाला मंत्री दिला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार दोन नवे विभाग करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे.

अजित पवारांना अर्थमंत्रीपद, तर वळसे पाटील आणि दत्ता भरणेंना 'ही' खाती
 
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली, की ''नवीन विभाग करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. वाणिज्य व व्यापारासाठी आणि देवस्थान संदर्भातही नवा विभाग करण्याचा विचार सुरु आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या धर्तीवर मुख्यमंत्री कार्यालयाला मंत्री दिला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

संग्राम थोपटेंचं चुकलं काय?
 
बाळासाहेब थोरात म्हणाले :
- उद्यापासून कामाला सुरुवात होईल, सर्वजण चांगले काम करतील
- तीन पक्षांचे सरकार असल्याने चर्चेतून खातेवाटप खेळीमेळीने पार पडले
- ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांच्यात थोडी नाराजी दिसत आहे. पण त्यांना बरोबर घेऊन त्यांची नाराजी दुर करु.
- मी आधी महसूल मंत्री असताना बदल करून सहजता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
- गेल्या पाच वर्षात त्यांच्याकडे (चंद्रकांत पाटील) अधिक खाती असल्याने आणि राजकीय जबाबदारी असल्याने ते तितकेसे लक्ष देऊ शकले नसावेत, असं मला वाटतं
- कर्जमुक्तीच्या प्रक्रियेची मोठी जबाबदारी महसूलकडे येणार आहे
- सरकार तीन पक्षांचे असले तरी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसारच काम करणार आहोत.
- शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करू
- सरकारमधील समन्वयासाठी दोन समित्या करणार आहोत. एक कॅबिनेटची असेल आणि दुसरी बाहेरची !
- उद्धव ठाकरे यांच्यात खुला संवाद करण्याची पद्धत आहे
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray government ready for two new divisions: Balasaheb Thorat