मुस्लिम समाजाने आरक्षणासाठी ‘थाळी बजाओ’ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

हिवाळी अधिवेशनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळण्याकरिता जनता संघर्ष दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळी बजाओ आंदोलन’ करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.

पुणे - हिवाळी अधिवेशनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळण्याकरिता जनता संघर्ष दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळी बजाओ आंदोलन’ करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

या आंदोलनात जनता संघर्ष दलाचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला, शहर अध्यक्ष शंकर पोटे, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष चांदभाई बलबट्टी, महिलाध्यक्षा रशिदा शेख, शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष मतीन मुजावर, जनशक्ती विकास संघाचे अध्यक्ष असिफसोफी खान, बहुजन मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश भोसले, शबाना खान, फरीदा मेमन, आयमान शेख, जावेद खान, सईद शेख आदी उपस्थित होते.

या वेळी मुल्ला म्हणाले, की मुस्लिम समाज भारत देशाचा घटक आहे, असे सांगावे लागणे हे दुर्दैव आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन आर्थिक दुर्बल घटकाला बरोबर घेऊन सक्षम करावे. नव्या राज्य सरकारने त्वरित विधेयक मंजूर करावे. तसे न झाल्यास अधिवेशन संपताच सरकारविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thali bajao agitation by muslim society for reservation