खडकी कॅन्टोन्मेंट रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना रुग्णांचे डोळे पाणावताहेत कारण...

हरीश शर्मा
Wednesday, 15 July 2020

देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. मोठ्या संख्येत रुग्णांची वाढ होत आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी बेड शिल्लक नाही तर काही ठिकाणी रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळत नाही. मात्र, याला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय अपवाद ठरत आहे. खडकीतील आंबेडकर रुग्णालयात रुग्णांना व्यवस्थित वेळच्या वेळी उत्तम उपचार मिळत असून डॉक्टर व परिचारिका रुग्णांची उत्तम काळजी घेऊन रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

खडकी बाजार (पुणे) : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. मोठ्या संख्येत रुग्णांची वाढ होत आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी बेड शिल्लक नाही तर काही ठिकाणी रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळत नाही. मात्र, याला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय अपवाद ठरत आहे. खडकीतील आंबेडकर रुग्णालयात रुग्णांना व्यवस्थित वेळच्या वेळी उत्तम उपचार मिळत असून डॉक्टर व परिचारिका रुग्णांची उत्तम काळजी घेऊन रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. रुग्णांना उपचारादरम्यान मिळणाऱ्या सुविधा जेवण अतिशय उत्तम प्रकारचे व सकस तसेच ताजे दूध इत्यादी मिळत असल्यामुळे खडकीतील रुग्ण डिस्चार्ज घेताना बोर्डाचे व रुग्णालयातील डॉक्टर व परिचरिकांचे आभार मानत जड अंतकरणाने पाणावलेल्या डोळ्याने निरोप घेत आहेत.                                           

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकी कॅन्टोन्मेंट रुग्णालयाचे निवासी डॉ. रणजित भोसले हे पहिल्या दिवसापासून चोवीस तास रुग्णांच्या सेवेसाठी धडपडत असून इतर डॉक्टर  व परिचारिका ही मनापासून स्वतःला रुग्णांच्या सेवेत झोकून देत आहेत आतापर्यंत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचया हद्दीतील 350 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले असून काही रुग्ण बेड शिल्लक नसल्यामुळे बाहेरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 188 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर सद्यस्थितीत 147 रुग्ण उपचार घेत आहेत त्यापैकी बोर्डात उपचार घेणाऱ्या रुग्णांनी रुग्णालयाचे आभार मानले असून बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह यांचे ही आभार व्यक्त केले आहे.                                       

शिवछत्रपतींच्या आणखी एका सरदाराचे स्मारक सापडले; मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाची कामगिरी

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात रुग्णांसाठी उत्तम उपचार मिळत असून डॉक्टर व पूर्ण कर्मचाऱ्यांचे मानेल तेवढे आभार कमी आहेत. उपचारादरम्यान रुग्णालयात मिळणारे जेवण अतिशय चांगल्या  क्वालिटीचे असून रुचकर आहे. खरोखरच रुग्णालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो                                            

- अमित गायकवाड, उपचार घेतलेले रुग्ण.                                

 

मला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उत्तम सेवा मिळाली, वेळेवर औषधे, वेळोवेळी आपुलकीने विचारपूस करणारे डॉक्टर भोसले व त्यांचा पूर्ण स्टाफ यांच्यामुळे मनाला बरे वाटत होते आता मी पूर्ण बरी होऊन घरी आली आहे .

-निर्मला पानसरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thank you to the patients for the good service of Khadki Cantonment Hospital