Pune : सहावी पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी परिषद २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

सहावी पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी परिषद २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार

पुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) तर्फे सहाव्या पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी (पीडीएनएस २०२१) या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २८ व २९ ऑक्टोबर रोजी ही परिषद ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. ‘आपत्ती आणि साथीच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा सज्जता’ ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. परिषदेत आपत्ती आणि साथीच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय यावर सखोल चर्चा होईल. अशी माहिती पीआयसीचे विश्र्वस्त लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनायक पाटणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या परिषदेचे उद्घाटन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांचे बीजभाषण होईल. गुरुवारी (ता. २८) सकाळी १०.२० ते ११.३० दरम्यान हा कार्यक्रम होईल. त्याचबरोबर नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, माजी लष्करप्रमुख व राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे उपाध्यक्ष जनरल एन. सी. वीज, पॉलिसी परस्पेक्टिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष प्रद्योत हलदर, उपाध्यक्ष के. एम. सिंह, बालाजी विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एस. आर. राव, वरा टेक्नोलॉजीजचे सायबर सिक्युरिटी प्रमुख कर्नल. इंदरजित सिंग, जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सचे सीईओ डॉ. संजय सिंह, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स अँड सोसायटीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा आदी सहभागी होणार आहेत.पीआयसीतर्फे परिषदेच्या माध्यमातून एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाईल. यामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने धोरणांची रचना करण्यात प्रशासनाला देखील मदत होईल. असेही पाटणकर यांनी सांगितले.

येथे करा नोंदणी

ही परिषद सर्वांसाठी खुली असून परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना या लिंकवर नावनोंदणी करता येईल.

पहिला दिवस https://us06web.zoom.us/webinar/register/WN_Pz2pG70CQqGrR4-3tw37HA

दुसरा दिवस https://us06web.zoom.us/webinar/register/WN_6D50rhVzTtiNwuMmw_Pg3w

पीडीएनएस २०२१ मधील सत्रे

  1. राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून आपत्तीचा धोका कमी करणे

  2. बाह्य घटक आणि भविष्यातील धोके

  3. भविष्यातील धोक्यांना सामोरे जाताना-विज्ञान तंत्रज्ञानाची भूमिका

  4. अन्य अनुषांगिक आवश्यक बाबी

Web Title: The 6th Pune Dialogue On National Security Conference Will Start From 28th October

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top