Pune Crime : जादूटोण्याच्या अघोरी पुजेनं विद्येचं माहेरघर हादरलं; विवाहित... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Pune Crime : जादूटोण्याच्या अघोरी पुजेनं विद्येचं माहेरघर हादरलं; विवाहित...

विद्येच्या माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात जादूटोणा करुन अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी व मुल बाळ व्हावं यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी महिलेची अघोरी पूजा केली आहे.

पत्नीला आरोपी पती तसेच घरातील इतर ७ जणांनी संगनमत करून शारीरिक व मानसिक छळ करून वारंवार मारहाण करून शिवीगाळ केल्याचा हा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील धायरी भागात हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा पैशांची मागणी केली होती. याबरोबरच सासरचे लोक महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी अनेक वेळा मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करायचे. घरात भरभराटी व्हावी तसेच महिलेला मुलगा यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर-जाऊ या सगळ्या जणांनी मिळून अघोरी आणि जादूटोणा करून पूजा देखील घातली होती. सासरच्या जाचाला कंटाळून अखेर या महिलेने पोलिसात धाव घेतली.

हेही वाचा: Amruta Fadanvis : अमृता फडणवीस यांची ‘ती’ क्लिप वादाच्या भोवऱ्यात

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव यांच्यावर भारतीय दंडात्मक कलम ४९८ (अ), ३२३, ५०४,५०६/२, ३४ सह महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम ३ अंतर्गत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Narendra Modi : 'मी मुंबईत असेन…' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट

टॅग्स :punecrime