esakal | Pune : बॅंकाची तंत्रज्ञान विकासाची मानसिकता; तज्ज्ञांचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

bank

बॅंकाची तंत्रज्ञान विकासाची मानसिकता; तज्ज्ञांचे मत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच सहकारी, नागरी बँकांची तंत्रज्ञान विकासाची मानसिकता असून बॅंकांना परवडणा-या दरात सेवा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे मत इन्फोसिस फिनाकल कंपनीचे वरिष्ठ संचालक सुहास पाटील व मोडस कंपनीचे प्रिन्सिपल करस्पाॅंड नितीश आगरवाल यांनी व्यक्त केले. परिषदेच्या दुसऱ्या नाॅलेज सत्रात पाटील आणि आगरवाल बोलत होते.

कोरोना पूर्व आणि कोरोना पश्चात परिस्थिती बदलली आहे, असे स्पष्ट करत पाटील यांनी सांगितले, "काॅसमास, सारस्वत, युनियन बँक तांत्रिक दृष्ट्या आम्ही सक्षम केल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच सहकारी बँका तांत्रिक दृष्ट्या बदल करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. काळानुरूप होत असलेला बदल कौतुकास्पद आहे. फिनॅकलच्या माध्यमातून कालसुसंगत बदल केले जात आहेत. देशातील बॅंकिंग डोळ्यासमोर ठेवून आम्ही तंत्रज्ञान विकसित केले आहे. ग्राहकाभिमुख सेवा देणे महत्त्वाचे आहे.

ते म्हणाले, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या सुचनांनुसार आम्ही तंत्रज्ञान विकसित केले आहे. सायबर सिक्युरिटी व अन्य तांत्रिक बाबी लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसित केले आहे. सर्व बॅंकांना परवडणा-या दरात ते उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता गरजे इतकीच तंत्रज्ञान देऊन तितकीच गुंतवणूक करण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. नवीन तंत्रज्ञानाला दिशा देण्याचे काम सुरू आहे.

आगरवाल म्हणाले, "छोट्या बॅंकांना परवडणा-या दरात तांत्रिक सेवा देण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. सध्या अल्प दरात अधिकाधिक अॅप्लिकेशन आम्ही उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा होत आहे."

loading image
go to top