राजगुरुनगरच्या १३ सायकलस्वारांची मोहीम यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajgurunagar

राजगुरुनगरच्या १३ सायकलस्वारांची मोहीम यशस्वी

पाईट: स्वातंत्र्य दिनानिमित्ताने राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू सायकलिस्ट क्लबच्या तेरा सायकलस्वारांनी १६० किमी अंतराची गेटवे ऑफ इंडिया मोहीम एका दिवसात यशस्वीपणे पार पडली. यामध्ये अजित गायकवाड, कुणाल रावल, श्रीकांत गोरडे, लक्ष्मण नलावडे, सुनील धुमाळ, तुषार महाले, आकाश खोंड, अतुल हिंगे, दीपक हिंगे, दीपक कोराळे, महादेव, निखिल लोहकरे, डॉ. भूषण साळी यांचा समावेश आहे.

सायकल राईडची सुरुवात राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली. त्यावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. राजगुरुनगर, चाकण, तळेगाव दाभाडे, लोणावळा, खोपोली, पनवेल, वाशी, चेंबूर यामार्गे गेटवे ऑफ इंडिया असे सुमारे १६० किलोमीटर अंतर पार करीत मोहीम यशस्वी करण्यात आली.

हेही वाचा: आमच्याकडे कुणी लक्ष देणार काय?

पाऊस, वाऱ्यावर मात करत राजगुरुनगरच्या सायकलस्वारांनी पोल्यूशन फ्री इंडिया’ हा नारा देत मोहीम पूर्ण केल्याचे कुणाल रावळ यांनी सांगितले. मोहिमेसाठी मुंबईचे लक्ष्मण नवले व अभिजित गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले. राईड पूर्ण झाल्यानंतर नारायणगावच्या शिवजन्मभूमी सायकलवारी परिवाराचे धनंजय माताडे, सुनील इचके व अभिजित शेटे यांनी सहभागी सायकलस्वारांचे अभिनंदन केले.

Web Title: The Campaign Of 13 Cyclists Of Rajgurunagar Was Successful

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News