ओशो आश्रम प्रकरणी केंद्राचा हस्तक्षेप हवा

ओशोप्रेमी संघटनांची मागणी
osho ashra,
osho ashra,sakal
Updated on

पुणे : कोरेगावपार्कमधील प्रख्यात ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. त्याचप्रमाणे ओशो आश्रमातील विश्वस्तांनी सुमारे १८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप गीतकार व ओशो फॉरएव्हरचे प्रवक्ते स्वामी गोपाळभारती व ओशो संन्यासी स्वामी जोरबा यांनी पत्रकार परिषदेत केली. आश्रमाचे संचालक मंडळ केंद्र सरकारने बरखास्त करावे, अशीही मागणी त्यांनी केली.

osho ashra,
येरवडा, नगर रस्ता भागात मोठी अतिक्रमण कारवाई; चौदा ट्रक माल जप्त

स्वामी जोरबा म्हणाले, ‘‘ओशो (रजनीश) भारतीय संस्कृतीचा भाग असून त्यांनी वेद, उपनिषेदातील गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशात पोहचवले आहे. जगभरात त्यांचे लाखो अनुयायी असून पुण्यातील ओशो यांच्या आश्रमात भेट देतात. मात्र, या ठिकाणचा आश्रम कोरोना काळात तोट्यात असल्याचे दाखवून आश्रमाची काही जमीन उद्द्योगपतींना विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ओशो आश्रमाचे अस्‍तित्त्व कायम राहण्यासाठी ओशो प्रेमी संघर्ष करत आहे.’’

osho ashra,
पुण्यात UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी 'फाईव्ह स्टार' अभ्यास केंद्र

ओशोंची दुर्मिळ छायाचित्रे, हिरे आणि महत्वपूर्ण कागदपत्रे अमेरिकेस हलविण्यात आाली आहेत. त्यांचे कॉपी राईटस व ट्रेडमार्कची परवानगी स्विर्झलंडकडून प्राप्त करुन घ्यावी लागत आहे. ओशोंना सदगुरु न मानता त्यांना जाणीवपूर्वक केवळ एका लेखकाच्या स्वरुपात सादर केले जात आहे. ओशो फाऊंडेशन इंटरनॅशनल व नवसंन्यास (रजनीश) फांडडेशननचे ट्रस्टींनी आश्रमात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला असून त्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ओशो प्रेमी ओमप्रकाश पांडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com