'केंद्र सरकारने देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे'

babu genu
babu genu sakal media

मंचर : “देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याचे रणसिंग फुंकले. मुंबईत काळबादेवी रोडवर हनुमान गल्लीसमोर ता. १२ डिसेंबर १९३० रोजी स्वदेशी वस्तुंचा वापर व परदेशी वस्तुंवर बहिष्कार आंदोलन सुरु होते. त्यावेळी विदेशी कपड्यांनी भरलेल्या ट्रक समोर छातीचा कोट करून उभे राहून त्यांनी बलिदान दिले. येथे बाबू गेनू सैद यांचे स्मारक भारत सरकार तर्फे व्हावे, आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे-पडवळ येथील सैद वाडीतील बाबू गेनू यांच्या जन्मस्थळाला पंतप्रधानांनी भेट देऊन श्रध्दासुमन अर्पण करावे.”या मागण्यांचे निवेदन मेलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “सांडला कलश रक्ताचा” पुस्तकाचे लेखक प्रा. वसंतराव भालेराव यांनी पाठविले आहे.

babu genu
मंचर : खुनाला वाचा फुटली, लग्न होण्याऐवजी आरोपींची वरात पोलिस ठाण्यात

भालेराव म्हणाले, “पंतप्रधानांना 'मन की बात'साठी हुतात्मा बाबूगेनू यांचे संदर्भात पत्रासोबत “सांडला कलश रक्ताचा” हे पुस्तकही पाठवले आहे. २२ वर्षाच्या देशभक्त बाबू गेनू या तरुणाने डोळ्यासमोर मृत्यू दिसत असतानाही इंग्रज अधिकाऱ्यांच्या मालमोटारीसमोरून ते इंच भरही हलले नाहीत. हातात तिरंगा घेऊन वंदे मात्रमच्या घोषणा देऊन देशाच्या स्वातंत्र लढ्यासाठी त्यांनी बलिदान दिले होते. त्यानंतरच स्वातंत्रलढ्याचा अग्निकुंड पेटला. मोदीजी यांनी "आत्मनिर्भर भारताचे" अभियान देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुरू केले आहे.”

“मोदीजी यांनी बाबू गेनू यांच्या जन्मस्थळाला भेट दिल्यास "आत्मनिर्भर भारतासाठी"एक सकारात्मक संदेश संपूर्ण देशात जाईल. आपला देश आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण होईल.” असेही भालेराव यांनी निवेदनात नमूद केले आहे.

babu genu
पुणे- सातारा प्रवास हाेणार सुखकर; आठ किलोमीटरचे अंतर होणार कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com