पुणे- सातारा प्रवास हाेणार सुखकर; आठ किलोमीटरचे अंतर होणार कमी

Proposed Khambatki Ghat
Proposed Khambatki Ghatsystem

खंडाळा (जि. सातारा) : पुणे-सातारा महामार्गावरील (pune satara national highway) ये-जा करण्यासाठी दोन्ही खंबाटकी बोगदा (khambatki tunnel) व रस्त्याचे काम लॉकडाउनच्या (lockdown) काळातही जोमाने सुरू आहे. पुण्याहून साताऱ्याला ये-जा करण्यासाठी खंबाटकी बोगद्यातून जावे लागणार असल्याने सध्याचा खंबाटकी घाट रस्ता इतिहासजमा होणार आहे. या बोगद्यामुळे पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकूण आठ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. (marathi-news-less-time-travelling-pune-satara-eight-kilometers-khambatki-ghat)

खंबाटकी घाटात धोकादायक इंग्रजी "एस' आकाराच्या (s-turn) तीव्र उताराच्या वळणावर व घाटरस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. या घटनेचे गांभीर्य पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे धोकादायक वळण काढण्यासाठी येथे दोन बोगद्यांसह 6.46 किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला 28 फेब्रुवारी 2019 ला मंजुरी देण्यात आली. या कामाचे 493 कोटींचे बजेट आहे. हे काम सलग तीन वर्षे सुरू राहणार असून 27 फेब्रुवारी 2022 ला बोगदा व रस्त्याचे काम संपवण्याची मुदत आहे. जून 2022 ला हे काम सर्व काम संपून हा रस्ता रहदारीसाठी सुरू होणार आहे.

हा एकूण 6.46 किलोमीटरचा हा रस्ता आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूकडे 1.2 किलोमीटरचा बोगदा असून, पुण्याच्या बाजूकडे जाताना बोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत दरी पुलाप्रमाणे उड्डाण पूल असणार असून कॅनॉलपासून पारगाव-खंडाळा येथील सर्व्हिस रोडपर्यंत भरावा रस्ता होणार आहे. यावेळी बेंगरुटवाडी व अंबारवाडी-पवारवाडीसाठी रस्ता असणार आहे.

Proposed Khambatki Ghat
Video पहा : असा झाला 'ग्रिफॉन'चा 900 किलोमीटर प्रवास

हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरत असलेला साताऱ्याहून पुण्याकडे जाताना सध्या वाहतूक सुरू असलेला बोगदा रस्ता हा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे धोकादायक "एस' आकाराचे वळणही इतिहासजमा होणार आहे. पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी सध्या सुरू असलेला व घाट चढून जाणारा खंबाटकी घाटरस्ता हा आपत्तीकालीन परिस्थितीवेळी सुरू राहील. सातारा बाजूकडे या बोगद्याला सुशोभित करण्यात येणार असून, विविध झाडे, फुलझाडे व गोल डिझाइन बनविण्यात येणार आहे, तर पुणे बाजूकडे उड्डाण पूल बनविण्यात येणार आहे. तेथेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

सध्या, कोरोना काळातही नियम पाळून बोगद्याचे काम गायत्र प्रोजेक्‍टकडून सुरू असून एकूण 15 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

थोडक्‍यात महत्वाचे...

एकूण 6.46 किलोमीटरचा रस्ता

दोन्ही बाजूकडे 1.2 किलोमीटरचा बोगदा

कामाचे 493 कोटींचे बजेट

27 फेब्रुवारी 2022 पर्यंत काम संपणार

बोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत दरी पुलाप्रमाणे उड्डाण पूल

धोकादायक "एस' वळणही होणार इतिहासजमा

Proposed Khambatki Ghat
महाबळेश्वर : ...तरच लॉकडाउनचे नियम शिथिल होतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com