esakal | सासू नंतर सुनेचा चारच दिवसात कोरोनामुळे मृत्यू; दौंड तालुक्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सासू नंतर सुनेचा चारच दिवसात कोरोनामुळे मृत्यू; दौंड तालुक्यातील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केडगाव : खोर ( ता.दौंड ) येथे सासू नंतर सुनेचा चारच दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाला. काल खोरमधील हरिबाचीवाडी येथे एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सासू असलेल्या मुक्ताबाई शंकर डोंबे ( वय १०५ ), तर त्यांच्या सून असलेल्या पारूबाई भाऊसाहेब डोंबे ( वय ५५ ) यांचे चार दिवसांच्या फरकाने निधन झाले. या दोघींना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत उपसरपंच पोपट चौधरी म्हणाले, आतापर्यंत गावात सात ते आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: पोलिस आयुक्तांनी केले ट्विट; पुणेकरांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन

डोंबेवाडी परिसरात रूग्णांची संख्या जास्त असल्याने हा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. नागरिक भीतीपोटी हा आजार अंगावर काढत असल्याने रूग्णांची संख्या कमी होत नाही. आशा सेविकांकडून गावचा सर्व्हे चालू आहे. त्या सर्व्हेतून काही रूग्ण सापडले आहेत. त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॅा.सुरेखा पोळ म्हणाल्या, तालुक्यात कोविड सेंटर फार झाले आहेत. अलिकडच्या दिवसात रूग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे खोरमध्ये लगेच कोविड सेंटर सुरू करता येणार नाही.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image