esakal | पोलिस आयुक्तांनी केले ट्विट; पुणेकरांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस आयुक्तांनी केले ट्विट; पुणेकरांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन

पोलिस आयुक्तांनी केले ट्विट; पुणेकरांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : कोरोना रुग्णासाठीच आवश्यक प्लाझ्मा दान करण्याच्या एका महिलेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही पुणेकरांना ट्विटरद्वारे प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले.

वाघोली येथील रिचा जैन या महिलेने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना ट्विटरद्वारे आपण नागरिकांना प्लाझ्मा दान करण्यासंदर्भात आवाहन करावे, अशी इच्छा मागणी केली होती. जैन यांच्या या आवाहनास पोलिस आयुक्तांनीही रिट्विट करत जास्तीत जास्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

हेही वाचा: Success Story : कोरोना काळात कडू कारले ठरतेय गोड

पुणे पोलिसांनी आतापर्यंत कोरोनाशी लढा देताना १७ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गमाविल्याचे सांगितले. प्लाझ्मा व रक्ताचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयातील ५६२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. १२७ लोकांनी रक्तदान केल्याचे गुप्ता यांनी ट्विटरद्वारे सांगितले.

हेही वाचा: पुणेकरांनो, रेनकोट-छत्री सोबत ठेवा; जिल्ह्याला आज ‘यलो अलर्ट’

loading image
go to top