esakal | कुत्र्याचा राग मालकावर; कारची काच फोडून ४४ हजार लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

कुत्र्याचा राग मालकावर; कारची काच फोडून ४४ हजार लंपास

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे: पाळीव श्‍वान अंगावर धावून गेल्याने झालेल्या वादाचा राग मनात ठेवून, श्‍वानाच्या मालकाच्या कारची काच फोडून त्यातील ४४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड एकाने चोरले. शनिवारी रात्रीच्या नवी खडकी भागात हा प्रकार घडला.

हेही वाचा: कर्जाला कंटाळून मुलीचा खून ; आई-वडिलांची आत्महत्या

या प्रकरणी पोलिसांनी प्रज्वल बाराथे (वय २०, रा. बाराथे वस्ती, सुभाषनगर, येरवडा) याला अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुला विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास रघुनाथ बाराथे (वय ६७, रा. येरवडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादींच्या घरासमोरून जात असताना त्यांचे पाळीव कुत्रे आरोपीच्या अंगावर गेले. त्यावरून वाद झाला होता. फिर्यादीच्या जावयाने त्यांची कार नेताजी शाळेच्या गेटजवळ उभा केली होती.

दरम्यान, श्‍वान अंगावर आल्याने झालेल्या वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी कारची पाठीमागील काच फोडून नुकसान केले तसेच कारमधील बॅगेत ठेवलेली ४४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड असा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आरोपीस सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील बोधिनी यांनी केली.

loading image
go to top