Crime : 'द डॉन ऑफ सिंहगड रोड' सह टोळीची हवेली पोलीसांनी काढली भर पावसात धिंड

गुन्हेगारी टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी कडक कारवाई करणार असल्याची आयपीएस अनमोल मित्तल यांची माहिती.
Crime
CrimeSakal
Updated on

किरकटवाडी - इन्स्टाग्रामवर स्वतःला 'द डॉन ऑफ सिंहगड रोड' म्हणून मिरवणाऱ्या सराईत गुन्हेगार रवी जाधवसह त्याच्या टोळीतील इतर सहकाऱ्यांची हवेली पोलीसांनी सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा परिसरात भर पावसात धिंड काढली आहे.

हा जरी तपासाचा भाग असला तरी रहिवासी व व्यावसायिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून दहशत माजविणाऱ्या अशा गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस अनमोल मित्तल यांनी दिली आहे.

खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार रवी जाधव (वय 26, रा. सागर संकुल सोसायटी, रायकर मळा, धायरी.), अभिषेक विष्णू पवार (वय 21, ऋतुजा रेसिडेन्सी, धायरी-नऱ्हे रोड.), गणेश तुळशीराम पवार (वय 20, रा. लेबर कॅम्प, नांदेडगाव.), आदेश तानाजी कडू (वय21, रा. सर्व्हे नं. 30, महादेवनगर, नांदेड), गौरव पवार (वय 21) व त्यांच्या इतर चार ते पाच साथीदारांनी भांडणे सोडविण्यासाठी मधे आला म्हणून किरकटवाडी येथील तरुणाला बेदम मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हवेली पोलीसांच्या पथकाने अवघ्या काही तासांत या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

किरकटवाडी येथे ज्या ठिकाणी या गुन्हेगारांनी तरुणाला मारहाण केली होती त्या ठिकाणी तपासाच्या अनुषंगाने हवेली पोलीसांनी भर पावसात त्यांची धिंड काढली. भर दिवसा या गुन्हेगारांनी भाईगिरी करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे पोलीसांनी या तथाकथित भाईंची व 'द डॉन ऑफ सिंहगड रोड'ची 'योग्य पद्धतीने' खोड मोडली आहे. रवी जाधव या मुख्य आरोपीसह इतरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचे काम सुरू असून त्यांच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयपीएस अनमोल मित्तल यांनी दिली आहे.

किरकटवाडीतील ग्रामस्थांचे निवेदन

मागील काही दिवसांपासून किरकटवाडी येथे गुन्हेगारी टोळ्यांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने स्थानिक रहिवासी व परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा टोळ्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा यासाठी किरकटवाडी येथील ग्रामस्थांनी प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

'तपासाचा भाग म्हणून या आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले होते. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे व इतर वस्तू जप्त करण्यासाठी आरोपींकडे विचारपूस करण्यात आली. नागरिक व व्यावसायिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी पोलीस प्रशासन योग्य कार्यवाही करत आहे. या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असून नियमात बसल्यास संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कठोर कारवाई करण्याबाबत पडताळणी सुरू आहे. तसेच या टोळीत सहभागी असणाऱ्या इतर गुन्हेगारांचा कसून शोध घेण्यात येत आहे.'

- आयपीएस अनमोल मित्तल, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.