esakal | पुणे : बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

पुणे : बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या (Corona) सावटाखाली यंदाही गणरायाचे आगमन होत असले तरी पुण्याच्या (Pune) पारंपरिक गणेशोत्सवाचा (Ganesh Festival) उत्साह कमी झालेला नाही. सगळे नियम पाळत व खबरदारी घेत प्रमुख सार्वजनिक गणपती मंडळांनी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची सिद्धता केली आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० ते दुपारी १.३० या कालावधीत बहुतेक मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होईल.

प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी यंदाही निर्बंध असल्याने अनेक मंडळांनी भाविकांसाठी २४ तास ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, गणेशोत्सवाची ओळख असणारे सांस्कृतिक कार्यक्रमही फेसबुक व युट्यूबवरून प्रक्षेपित करण्याचे नियोजन केले आहे

हेही वाचा: मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीच्या आगमनाची तयारी...

  • मानाचा पहिला

-ग्रामदैवत कसबा गणपती सार्वजनिक मंडळ

स्थापना वर्ष : १८९३

प्रतिष्ठापनेची वेळ : सकाळी ११.३८ वा.

हस्ते : गिरीश बापट, खासदार

विद्यमान अध्यक्ष : श्रीकांत शेटे

ऑनलाइन दर्शन : @Shrikasbaganpati/Facebook

  • मानाचा दुसरा

ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ

स्थापना वर्ष : १८९३

प्रतिष्ठापनेची वेळ : सकाळी ११.३० वा.

हस्ते : मोरेश्वर घैसास गुरुजी, प्राचार्य, वेदभवन

विद्यमान अध्यक्ष : प्रसाद कुलकर्णी

ऑनलाइन दर्शन : @Shree Tambadi Jogeshwari Ganeshotsav Mandal/YouTube

  • मानाचा तिसरा

गुरुजी तालीम गणपती मंडळ

स्थापना वर्ष : १८८७

प्रतिष्ठापनेची वेळ : दुपारी १ वा.

हस्ते : पुनीत बालन, उद्योजक

विद्यमान अध्यक्ष : प्रवीण परदेशी

ऑनलाइन दर्शन : @गुरुजी तालीम मंडळ/Facebook

हेही वाचा: मुंबई: गोवंडी इमारत दुर्घटनेत चौथा मृत्यू; 7 जणांवर उपचार सुरू

  • मानाचा चौथा

तुळशीबाग गणपती मंडळ

स्थापना वर्ष : १९०१

प्रतिष्ठापनेची वेळ : दुपारी १२.३० वा.

हस्ते : युवराज ढमाले, बांधकाम व्यावसायिक

विद्यमान अध्यक्ष : विकास पवार

ऑनलाइन दर्शन : @मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट/Facebook

  • मानाचा पाचवा

केसरीवाडा गणपती मंडळ

स्थापना वर्ष : १८९४

प्रतिष्ठापनेची वेळ : सकाळी १० वा.

हस्ते : रोहित व प्रणिती टिळक

विद्यमान अध्यक्ष : डॉ. गीताली टिळक

ऑनलाइन दर्शन : @KESARINEWSPAPER/YouTube

  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

स्थापना वर्ष : १८९३

प्रतिष्ठापनेची वेळ : सकाळी ९.४५ वा.

हस्ते : अशोक गोडसे, अध्यक्ष, दगडूशेठ गणपती मंडळ

विद्यमान अध्यक्ष : अशोक गोडसे

ऑनलाइन दर्शन : https://www.dagdushethganpati.com/

  • अखिल मंडई गणपती मंडळ

स्थापना वर्ष : १८९४

प्रतिष्ठापनेची वेळ : दुपारी १२ वा.

हस्ते : डॉ. अविनाश भोंडवे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष

विद्यमान अध्यक्ष : अण्णा थोरात

ऑनलाइन दर्शन :@akhilman daimandalpune / Facebook

  • श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ

स्थापना वर्ष : १८९२

प्रतिष्ठापनेची वेळ : दुपारी १२.३० वा.

हस्ते : प्रवीण परदेशी, अध्यक्ष, गुरुजी तालीम मंडळ

विद्यमान अध्यक्ष : संजीव जावळे

ऑनलाइन दर्शन : https: // www.bhaurangari.com

loading image
go to top