मुक्त विद्यालयातील पाचवी आणि आठवीचा निकाल 28 जूनला

मुक्त विद्यालयातील पाचवी आणि आठवीचा निकाल 28 जूनला

पुणे : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयात नोंदणी केलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निकाल येत्या सोमवारी (ता. २८) जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना सोमवारी अकरा वाजता हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

मुक्त विद्यालयातील पाचवी आणि आठवीचा निकाल 28 जूनला
पुणे जिल्हा बँकेने विकसित केले नवे मोबाईल अ‍ॅप

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळमार्फत आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळाच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये द्वितीय बॅचच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन १ ते १० जानेवारी दरम्यान करण्यात आले होते. या मूल्यमापनाचा ऑनलाइन निकाल ‘www.msbos.mh-ssc.ac.in’ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

मुक्त विद्यालयातील पाचवी आणि आठवीचा निकाल 28 जूनला
पुणे जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट

राज्य मुक्त विद्यालयाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना निकालाची प्रत (प्रिंट आऊट) घेता येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हता आणि विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com