esakal | पुणे जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट
sakal

बोलून बातमी शोधा

corona

पुणे जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे शहर (Pune City) व पिंपरी चिंचवड पाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील (Rural Area) कोरोना बाधितांचा (Corona Patient) दर (कोरोना पॉझिटिव्हिटी रेट) हा सात टक्क्यांच्या आता आला आहे. पुणे जिल्ह्यातील सोमवारची कोरोना रुग्णांची एकूण रु्ग्णसंख्या 663 आहे त्यापैकी पुणे शहरात, 136, पिंपरी चिंचवड -151, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र - 290, नगरपालिका क्षेत्र - 56, कँटोन्मेंट बोर्ड - 03 रुग्ण आढळले आहे. पुणे जिल्ह्यात आज एकूण 1381 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण 22 जणांना मृत्यू झाला आहे.(663 Corona Positive, 1381 recovered in Pune district)

पुणे शहरात आज एकाच दिवसात 3 हजार 872 नमुने घेण्यात आले. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 18 हजार 784 इतकी झाली. सोमवारी दिवसभरात शहरातील 223 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 4 लाख 64 हजार 983 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरात नवीन 136 रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 4 लाख 75 हजार 990 इतकी झाली आहे.

हेही वाचा: Monsoon Fashion For Men : फॅन्सी लूकसाठी फॉलो करा 7 टिप्स

सध्या पुण्यात उपचार घेणाऱ्या 2 हजार 470 रुग्णांपैकी 359 रुग्ण गंभीर तर 503 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे पुणे शहरात 8 हजार 537 जणांचा मृत्यू झाला.

पुणे जिल्ह्यात बाधितांचा दर कमी झाला असला तरी, किमान आठवडाभर ग्रामीण भागातील कडक निर्बंध (Restrictions) कायम राहणार आहेत. ग्रामीणमधील निर्बंध शिथिलतेबाबतच्या निर्णय येत्या शुक्रवारी (ता.२५ ) पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. या वृत्ताला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: पुण्यात बाधितांचा दर कमी, पण निर्बंध कायम

पुणे कोरोना अपडेट : सोमवार दि.21 जून,2021

◆ उपचार सुरु : 2470

◆ नवे रुग्ण : 136 (475990)

◆ डिस्चार्ज : 223 (464983)

◆ चाचण्या : 3872 (2618784)

◆ मृत्यू : 6 (8537)

loading image