
Pune News : मानाच्या पहिल्या आंब्याची पेटी मार्केटयार्डात! एका पेटीची किंमत तब्बल...
आंबा हे फळ सगळ्याचं आवडत फळ. आंबा पहिला की सर्वानाच मोह अनावर होतो. आंबा पिकायला आणि बाजारपेठेत विक्रीसाठी येण्याला एप्रिल महिना उजाडतो. परंतु पुण्यात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. तर पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीची किंमत 41 हजार रुपये इतकी आहे.
पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्याची विधीवत पूजा आज पार पडली आहे. यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे.
हेही वाचा: Pune News: मुंबईनंतर ठाकरेंची शिवसेना पुण्यात रणशिंग फुंकणार; मुलूखमैदानी तोफ धडाडणार
आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी 41 हजार रुपयांना विकली गेली आहे. युवराज काची या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये पाच डझन आंबे आहेत.
हेही वाचा: Pune Police : गृहमंत्री अमित शहा, चंद्रकांत पाटलांवर आक्षेपार्ह टिप्पणी; कन्नडच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल