Pune News:  घरकुलाचा निधी मिळाला नाही,   पावसाने घराची भिंत कोसळली अन्....
Pune Newssakal

Pune News: घरकुलाचा निधी मिळाला नाही, पावसाने घराची भिंत कोसळली अन्....

Ambegaon News: ग्रामपंचायतीने रणपिसे यांच्या नावाचा समावेश प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल यादीत केला आहे |

Maharashtra News: पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील रणपिसे वस्ती येथे पावसाने घराची भिंत कोसळून घरात झोपलेल्या सुलाबाई रखमा रणपिसे (वय 67 वर्ष) या वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्या आहे.

Pune News:  घरकुलाचा निधी मिळाला नाही,   पावसाने घराची भिंत कोसळली अन्....
Pune Rain Updates : पहिल्या दहा दिवसातच सरासरीच्या निम्मा पाऊस; पुणे शहरात सर्वाधिक २०१ मिलिमिटरची नोंद

काल सोमवारी रात्री पासुन पोंदेवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली आज मंगळवार पहाटे पर्यंत पाऊस पडत होता. येथील रणपिसे वस्ती येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रखमा रभाजी रणपिसे यांच्या घराची भिंत पावसाने खचून कोसळल्याने आतमध्ये झोपलेले सुलाबाई रणपिसे गंभीर जखमी झाल्या.(mumbai news)

घरात झोपलेले रखमा रभाजी रणपिसे सुदैवाने बचावले भिंत कोसळ्याचे समजताच जवळच राहणारे रणपिसे यांचे भाचे कुंडलिक पोखरकर यांनी जखमी सुलाबाई रणपिसे यांना घराच्या बाहेर काढुन पारगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.त्यांच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे.

या वृद्ध दांपत्याचे जुने घर मोडकळीस आल्याने ग्रामपंचायतीने रणपिसे यांच्या नावाचा समावेश प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल यादीत केला आहे. परंतु एक वर्ष होऊनही घरकुल साठी निधीची तरतूद झाली नाही शासनाने घरकुलसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा अशी मागणी सरपंच नीलम अनिल वाळुंज यांनी केली आहे.(latest Pune News )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com