
बिबवेवाडीतील पार्किंग चा फज्जा; वाहतूक पोलिस, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.
बिबवेवाडी : स्वामी विवेकानंद मार्ग, बिबवेवाडी कोंढवा रस्ता, के.के.मार्केट रस्त्यावरील सम व विषम तारखेच्या पार्किंग चा फज्जा उडालेला असून महापालिका प्रशाशासन व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरीकांना याचा फटका बसत आहे.
स्वामी विवेकानंद मार्ग सिमेंट काँक्रीट चा करताना फक्त दुचाकी वाहने पार्किंगची वेवस्था काही चुकीच्या ठिकाणी करण्यात आली आहे, नागरिकांनी अनेक वेळा पार्किंग वेवस्थे बाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे, परंतु प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा फटका वाहतुकीला बसत आहे, रस्त्यावरील सम विषम तारखे च्या पार्किंग नो पार्किंग झोन चे फलक गायब झाले आहेत त्यामुळे रस्त्यावर कोठेही वाहने पार्किंग केली जातात त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असून अनेकदा वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.
विवेकानंद मार्गावर अनेक रुग्णालये, हॉटेल, बस थांबे, रिक्षा स्टँड आहेत तर त्याला समांतर असलेल्या के.के.मार्केट, पार्श्वनाथ नगर रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात त्यामुळे येथे अनेकवेळा अपघात झाले आहेत. नो पार्किंग चे फलक नसल्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई करताना वादावादी चा सामना करावा लागतो. विवेकानंद मार्गावरील अण्णाभाऊ साठे पुतळा चौकात पार्श्वनाथ सोसायटीतून येण्यासाठी वाहनांना बंदी आहे त्यामुळे वाहने सह्याद्री हॉस्पिटल किंवा लाइट हाऊस येथून विवेकानंद मार्गावर येतात परंतु येथे दुतर्फा वाहने पार्किंग केल्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते, हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या रुग्णाला वाहतूक कोंडीचा फटका बसतो.
शफील पठाण ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकार नगर वाहतूक विभाग ) रस्त्यावरील नो पार्किंग, सम विषम तारखांचे फलक नसल्यामुळे अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात अडचणी येत असून, संबंधित ठिकाणी फलक लावण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाशी पत्रवेव्हर करण्यात आला आहे.
गणेश सोनुने ( वाहतूक व्यवस्था संबंधित फलक नसलेल्या ठिकाणी पाहणी करून तातडीने फलक लावण्याची वेवस्था करण्यात येईल.