
Old Buildings Get New Life in Mumbai : मुंबईत जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची मोठी लाट आली आहे. मुंबईच्या इतिहासातील हा सर्वात मोठा परिवर्तनाचा टप्पा आहे. उंचावलेल्या क्रेन्स आता मुंबईच्या आकाशरेषेचे नवे चित्र रेखाटत आहेत. रस्त्यांची कामे, मेट्रो प्रकल्पांसारख्या पायाभूत सुधारणांची कामे आणि आता पुनर्विकासाच्या बांधकामांची कामे यांचा आवाज दाट लोकवस्तीच्या दैनंदिन लयीत मिसळला जात आहे. आज मुंबईत विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तिसऱ्या घराचे मूळ पुनर्विकसित प्रकल्पात आहे, असा एक अंदाज आहे.