पुण्यात चालणाऱ्यांचा ग्रूप पोचला २० हजार सदस्यांपर्यंत ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात चालणाऱ्यांचा ग्रूप पोचला २० हजार सदस्यांपर्यंत !
पुण्यात चालणाऱ्यांचा ग्रूप पोचला २० हजार सदस्यांपर्यंत !

पुण्यात चालणाऱ्यांचा ग्रूप पोचला २० हजार सदस्यांपर्यंत !

पुणे : व्यायाम प्रकार(exercise) म्हणून आपआपल्या भागात रोज नियमितपणे चालणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या चालणाऱ्या पावलांना एकत्र करून विधायक उर्जा तयार करून ती समाजासाठी वापरली गेली तर, ही भन्नाट कल्पना शहरात प्रत्यक्षात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ‘वॉक इट ऑऊट,(walk it out) टॉक इट ऑऊट’ (वायाटायो) या चालणाऱ्यांच्या ग्रूपची मजल आता २० हजार सदस्यांपर्यंत पोहचत आहे. शहरातूनच नव्हे तर, देशातून आणि परदेशातूनही अनेक व्यायामप्रेमी या ग्रूपमध्ये सहभागी झाले आहेत. (The group of people walking in Pune has reached 20,000 members!)

हेही वाचा: कोरेगाव-भीमा : चार लाख अनुयायांची उपस्थिती, ५ जण कोरोना पॉझिटिव्ह

चालणं, हा व्यायामप्रकार लोकप्रिय करणे आणि चालणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हे ‘वायाटायो’ ग्रूपचं उद्दिष्ट असून त्यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाही, हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातील १८ ते ७५ वयोगटातील नागरिक या ग्रूपमध्ये सहभागी झाले आहेत. ग्रूपची सदस्यसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. समुपदेशक नेहा येवले यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सात वर्षांपूर्वी‘वायाटायो’ हा ग्रूप स्थापन केला. परंतु, त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यावर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सर्वांसाठीच हा ग्रूप खुला केला. डॉक्टर, उद्योजक, व्यापारी, शिक्षण आदी अनेक क्षेत्रातून खूपजण या ग्रूपमध्ये सहभागी झाले.

हेही वाचा: कोरोनाच्या तिस-या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज; अजित पवार

रोज किमान ३ किलोमीटर चालले पाहिजे, हा ग्रूपचा नियम आहे. आपआपल्या भागात चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांनी रोज त्यांचे अपडेटस व्हॉटसग्रूप अथवा फेसबुकवर टाकायचे. तसेच १५ दिवसांतून एकदा तरी, शहराच्या वेगवेगळ्या भागात ग्रूप वॉक आयोजित केला जातो. काही वेळा नाईट वॉकचेही आयोजन होते. २१, ५० आणि कधी कधी तर, ७० किलोमीटरचाही वॉक ग्रूपकडून आयोजित केला जातो. बाबत येवले म्हणाल्या, ‘‘चालण्याच्या व्यायाम प्रकारामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा होते. त्यामुळेच आम्ही ग्रूप तयार केला आहे. एक-दोन किलोमीटरच्या अंतरासाठी सगळ्यांनी चाललेच पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. त्याची जाणीव विद्यार्थ्यांतही व्हावी, यासाठी ‘वॉक टू स्कूल़’ हा उपक्रमही काही शाळांसोबत राबवितो.’’

हेही वाचा: पुणे हादरलं! औषधांचा ओव्हर डोस देत आईची हत्या, तरुणाची आत्महत्या

ग्रूपमध्ये सहा वर्षांपासून सक्रिय असलेल्या अपर्णा डोळे म्हणाळ्या, ‘‘फेसबुकच्या माध्यमातून मला या ग्रूपची माहिती समजली. मी जॉईन झाल्यावर रोज किमान ३ किलोमीटर चालतेच. त्यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होतेच, शिवाय माझ्या वैयक्तिक उपक्रमांनाही ग्रूपचे छान सहकार्य मिळते. व्यायामप्रेमींसाठी हे एक चांगले व्यासपीठ आहे.’’व्यापारी संदीप नहार म्हणाले, ‘‘ग्रूपमध्ये जॉईन झाल्यापासून माझ्या चालण्याच्या व्यायामात नियमितता आली. त्यातून २१, ५० किलोमीटरपर्यंतचे उद्दिष्ट आता साध्य होऊ लागले आहे. विविध सणांनाही ग्रूप वॉक आयोजित केला जातो. तसेच दर महिन्याला चालण्याचे विशिष्ट उद्दिष्ट दिले जाते. त्यातून व्यायामाची प्रेरणाही वाढते. ’’

हेही वाचा: पंढरपुरात नवीन वर्षाच्या दिवशीच भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

चालण्याचे हे आहेत फायदे

डॉ. अनुप किणीकर म्हणाले, ‘‘चालण्यामुळे रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे सर्व अवयवांना रक्ताचा चांगला पुरवठा होतो. त्यातून त्यांचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच स्नायूही भक्कम होतात. पोट साफ होते. मानसिक उत्साहही वाढतो. त्यामुळे सर्वांनी रोज किमान ३ किलोमीटर चालण्याचा व्यायाम केलाच पाहिजे.’’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top