esakal | सकाळ'ने राबवलेला उपक्रम हा अत्यंत कौतुकास्पद - जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन
sakal

बोलून बातमी शोधा

urli kanchan

सकाळ'ने राबवलेला उपक्रम हा अत्यंत कौतुकास्पद - जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन

sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

उरुळी कांचन : महिला व युवतीसाठी सकाळने राबवलेला उपक्रम हा अत्यंत कौतुकास्पद असून पाककलेबरोबरच महिलांच्या ज्ञानात भर पडणार आहे. वर्तमानपत्रात सुगरण सदरावर आधारित महिलांसाठी अभिनव स्पर्धेस उदंड प्रतिसाद मिळेल यासाठी बचत गट व इतर गटाच्या महिलांना 'सुगरण या स्पर्धेची माहिती देणार असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन यांनी केले.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 'सकाळ' व 'अग्रोवान' च्या वतीने महिलांसाठी 'सुगरण' स्पर्धानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (ता.०९ ) करण्यात आले होते. यावेळी कीर्ती कांचन बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती माजी उपसभापती हेमलता बडेकर, उरुळी कांचनचे सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन, उपसरपंच संचिता कांचन, ग्रामपंचायत कार्यालयातील छाया कुंजीर, विजया धावरे, श्रद्धा कांचन, वैजयंता लोणारी व आशा वर्कर पद्मावती नायडू, सुवर्णा कांचन आदी उपस्थित होते.

याबाबत उरुळी कांचनच्या उपसरपंच संचिता कांचन म्हणाल्या, "दररोज समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्या घटना सत्य स्वरूपात लोकांसमोर पोहचविण्याचे काम "सकाळ" सातत्याने करत आहे. ग्रामीणसह शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकाळ अग्रगण्य आहे. सकाळ वृत्तपत्राच्या बातमीची मांडणी योग्य व मोजक्या शब्दात असल्याचे मत मांडले."

दरम्यान, 'सकाळ' व 'अग्रोवान' च्या वतीने महिलांसाठी 'सुगरण' ही स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन १० सप्टेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. यानुसार ९० दिवसांच्या कालावधीत सकाळ व अँग्रोवनच्या अंकात सुगरण नावाचे महिलांसाठी खास सदर प्रसिद्ध होईल. यात रेसिपीवर आधारित महिलांसंबंधीच्या विषयांबाबत लेख आणि खास सदरांचा समावेश आहे. यातील मजकूरावर आधारित दररोज एक प्रश्नाचे कुपन देण्यात येणार आहे. त्याचे उत्तर त्याच सदरात असेल. ते ९० पैकी ८० कुपन सकाळ किंवा ॲग्रोवन प्रवेशिकेवर चिकटवून ती सकाळ कार्यालयात जमा करायची आहे. या स्पर्धेत तब्बल एक कोटीहून अधिक रकमेची बक्षिसे आहेत, अशी माहिती सकाळचे वृत्तपत्र वितरण अधिकारी निलेश देशमुख यांनी दिली.

loading image
go to top