
रोहित वाळिंबे - rohit.walimbe@esakal.com
विल्यम सॅमरसेट मॉम ऊर्फ ‘विली’ हे विसाव्या शतकात आंग्ल साहित्यक्षेत्रात अनभिषिक्त सम्राटपद भूषवलेले लेखक. मानवी जीवनातील नातेसंबंध, प्रेम, वासना, वेदना यांसह मानवी स्वाभावाचे विविध ज्ञात-अज्ञात पैलू आपल्या लेखनातून मोठ्या खुबीने उलगडून सांगणाऱ्या या लेखकाचे वैयक्तिक आयुष्य कसे होते याची अनेकांना उत्कंठा असते. मराठी वाचकांची ही उत्कंठा शमवण्याचे काम आनंद ठाकूर यांनी ‘एक होता विली’ या विल्यम सॅमरसेट मॉम यांच्या संक्षिप्त चरित्रातून केली आहे.