esakal | कात्रज चौकात चेंबरमध्ये पडली व्यक्ती । katraj
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज चौकात चेंबरमध्ये पडली व्यक्ती

कात्रज चौकात चेंबरमध्ये पडली व्यक्ती

sakal_logo
By
अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : कात्रज चौकालगत सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाकण नसलेल्या व त्याठिकाणी बॅरिकेड ठेवलेल्या एका चेंबरमधे बेल बहाद्दूर (वय ३९) नागरिक १५ फुट खोल पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच कात्रज अग्निशामक दलाचे वाहन बाहेर असल्याने सिंहगड रस्ता अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बेल बहाद्दूर यांना दोरीच्या साह्याने फासागाठ करुन बाहेर काढले. या घटनेमध्ये बेल बहाद्दूर यांना कुठल्याही प्रकारची जखम झाली नाही. सदरील कामगिरी सिंहगड रस्ता अग्निशमन दलाचे वाहनचालक संतोष चौरे, तांडेल पांडुरंग तांबे व जवान सतिश डाकवे, संजू चव्हाण, संदीप पवार यांनी पाडली.

हेही वाचा: डोक्यात घुसले संशयाचे भूत, सतरा वर्ष संसार करून संपविले पत्नीला

दरम्यान, चेंबरचे झाकण चोरी गेल्यामुळे ही घटना घडली आहे. त्यामुळे अशा चोरीच्या घटना घडत असताना पोलीस आणि महापालिका प्रशासन काय करते? रस्त्यावरील चेंबरचे झाकण चोरीला जातेच कसे? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत. रात्रीच्या वेळेस चेंबरचे झाकण चोरीला गेले असल्याने ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ड्रेनेज विभागाकडून त्याठिकाणी दुसरे झाकण लावण्यात आले आहे. - प्रज्ञा पोतदार, सहा. आयुक्त, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

loading image
go to top