esakal | सासवडला मजुराचा खून अखेर उघडकीस; नेपाळी दारू पार्टनरला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

सासवडला मजुराचा खून अखेर उघडकीस; नेपाळी दारू पार्टनरला अटक

सासवडला मजुराचा खून अखेर उघडकीस; नेपाळी दारू पार्टनरला अटक

sakal_logo
By
श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

सासवड: येथील एका मजुराचा सासवड शहरातील सोनोरी मार्गावर अज्ञात लोकांकडून खून झाला होता. तो त्याच्या दारुड्या नेपाळी साथीदारानेच दारू पिण्याच्या वादातून केल्याचे आज स्पष्ट झाले. गुन्हा उघडकीस आला असून आरोपीस नेपाळच्या सीमेवरून पकडून आणण्यात सासवड पोलिसांनी राहुल घुगे यांच्या नेतृत्वाखाली यश मिळवले आहे.

खून झालेल्या व्यक्तीचे नाव भगवान शंकर राव मारकड (वय 45, आरोशी टेरेस सोसायटी, गणेश कार्यालय मागे सासवड) असे असून तो टायर रिमोड करण्याच्या एका वर्कशॉपमध्ये काम करीत होता. तर खून करणाऱ्या आरोपीचे नाव निरंजन सहानी (वय 21 राहणार बोरकर वस्ती सासवड, मूळ राहणार नेपाळ). आरोपीस अटक केली असून दिनांक 19 जुलै पर्यंत त्यास पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सासवड न्यायालयाने दिले आहेत. याबाबत मयत मारकड याची पत्नी सौ छाया भगवान मारकड यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून व परिस्थितीवरून खुनाचा गुन्हा नऊ जुलै रोजी दाखल झाला होता. तर निरंजन यास 13 जुलै रोजी ताब्यात घेऊन अटक केली.

हेही वाचा: पर्यावरणासाठी प्रणालीची सायकलस्वारी; 10 हजार किमी प्रवास

मयत मार्कड व आरोपी निरंजन हे दारू मटन पार्टीतिल जोडीदार होते. घटनेच्या आदल्या दिवशी घटनास्थळापासून काही अंतरावरच असलेल्या बोरकर वस्तीमध्ये निरंजन याच्या रूमवर दोघांची दारू मटन पार्टी झाली. या पार्टीमध्ये दोघांचा दारू पिण्यावरून वाद झाला. त्यामध्ये मारकडला नेपाळी निरंजन याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात रक्तस्त्राव होऊन मारकडचा जागीच मृत्यू झाला. नंतर मृतदेह कोणाला दिसु नये..म्हणुन लगेच जवळच्या नाल्यामध्ये ओढत नेऊन फेकून दिला. त्यानंतर आरोपी निरंजन एकाच्या दुचाकीने नेपाळकडे रवाना झाला.

सासवड पोलिसांचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या नेतृत्वाखाली नेपाळ सीमेजवळ पोचले. मोबाईल कंपनीच्या तांत्रिक मदतीने त्यांनी आरोपीला सीमेलगत 2,800 कि.मी.वर चलाखीने ताब्यात घेतले व सासवडला आणले. याबाबत आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती भोर उपविभागाचे डि.वाय.एस.पी. धनंजय पाटील यांनी दिली. यावेळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, राहुल घुगे हेही उपस्थित होते.

loading image