esakal | पर्यावरणासाठी प्रणालीची सायकलस्वारी; 23 जिल्ह्यांतून 10 हजार किमी प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

cycle

पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) गावातील प्रणाली विठ्ठल चिकटे या तरुणीने २३ जिल्ह्यांतून १० हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे.

पर्यावरणासाठी प्रणालीची सायकलस्वारी; 10 हजार किमी प्रवास

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

कात्रज : पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) गावातील प्रणाली विठ्ठल चिकटे या तरुणीने २३ जिल्ह्यांतून १० हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. पर्यावरणाची होणारी हानी, रासायनिक खतांच्या वापराने होणारे दुष्परिणाम, महिलांचे सक्षमीकरण, पाण्याची बचत आणि प्लास्टिकचा वापर टाळावा, असे संदेश देत एकवीस वर्षाची प्रणाली सध्या राज्यभर फिरत आहे. ती नुकतीच पुण्यात आली असून नागरिकांनी तिचे जोरदार स्वागत केले.

वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरण आणि ऋतुचक्रातील बदलातून निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी प्रणाली या यात्रेतून राज्यातील नागरिकांत जनजागृती करत आहे. पुण्यातील अनेक संस्थांशी ती सध्या संवाद साधत आहे. तिने स्वतःच्या हिमतीवर पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलवारी करण्याचा निर्धार केला आहे. या यात्रेत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कुठेही असुरक्षित वाटत नसल्याचे तिने सांगितले. हवा व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सायकलचा वापर करावा, प्लास्टिकचा वापर टाळावा, झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे, आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवावा आणि पाणी बचतीचा संदेश प्रणाली या प्रवासादरम्यान देत आहे.

हेही वाचा: इंधन दरवाढीविरोधात आंदोलन म्हणजे नौटंकी- देवेंद्र फडणवीस

''मी शेतकरी कुटुंबातील आहे. लॉकडाउनमध्ये पर्यावरणातील बदल वाचनात आले. त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्यभर पर्यावरणाबाबत जागृती करण्याचा विचार मनात आला. यातून ही सायकल यात्रा सुरु केली. शेतात सेंद्रिय पद्धतीचा वापर होण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. ही यात्रा संपल्यावर मी शेती करणार आहे.'', असं प्रणाली चिकटे म्हणाल्या.

हेही वाचा: कृषी विधेयकं मागे घ्या,अन्यथा..; 'मविआ'ला घटक पक्षांचा इशारा

असा झाला प्रवास...

यवतमाळपासून या यात्रेला केल्यानंतर पुढे विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशीम येथे आले. त्यानंतर बुलढाण्यावरून खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणेमार्गे कोकणात प्रस्थान केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून पुढे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासास सुरुवात केली. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून प्रवास केल्यानंतर पुण्यात दाखल झाल्याचे प्रणालीने सांगितले.

loading image