उद्यान बनले समस्याचे आगार | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 उद्यानातील लोखंडी बाकडे हे गंजलेले तसेच तुटलेले

रामवाडी : उद्यान बनले समस्याचे आगार

sakal_logo
By
सुषमा पाटील

रामवाडी : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग तीन आणि प्रभाग पाच मध्ये उद्यानातील लोखंडी बाकडे हे गंजलेले तसेच तुटलेले आहेत तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने उद्यानात येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे . प्रशासनाने या उद्यानातील समस्याची दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक उद्धव ढवळे सह अनेक उद्यानप्रेमी कडून केली जात आहे.

वडगावशेरी येथील प्रभाग तीन मधील बॉम्बे सँपर्स कॉलनी येथील उद्यानात नागरिकांना बसण्यासाठी जे लोखंडी बाकडे बसविण्यात आले आहे. काही रंगहीन झाले आहे तर काही गंजून गेले आहे. काही तुटलेले अवस्थेत शेवटच्या घटका मोजत आहे. अशी ही दयनीय अवस्था झाल्याने उद्यान बकाल दिसत आहे तर प्रभाग पाच मधील आनंद पार्क सोसायटी शेजारील अण्णा हजारे उद्यानात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडली आहे. सहा महिन्या पूर्वी रस्ते बनवताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटल्याने उद्यानात पाणी येत नाही.

हेही वाचा: महापालिकांच्या समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

कुलर असून खोळंबा अशी स्थिती या ठिकाणी झाली आहे. खेळून भागून थकलेल्या मुलांना उद्यानातील चौकीदारच्या घरातील बोअरवेल पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. लॉकडाउन मध्ये बंद असलेले उद्यान पुन्हा सुरू झाल्याने सकाळ संध्याकाळ जेष्ठ नागरिक, तरुण तसेच लहान मुलांची वर्दळ वाढली असुन उद्यानात असणार्‍या गैरसोय मुळे उद्यानप्रेमी कडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर उद्यानातील समस्या सोडवल्या जाव्यात अशी मागणी नागरिकांना कडून केली जात आहे.

माझ्या नातवंडांना संध्याकाळी खेळण्यासाठी उद्यानात घेऊन येतो पाण्याची बाटली बरोबर असते त्यातील पाणी संपते अशा वेळी पंचायत होते. काही लहान मुले चौकीदार कडून पिण्यासाठी पाणी मागत असतात.या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय लवकर करावी. - उद्धव ढवळे

उद्यानातील गंजलेल्या बाकड्यामुळे कपडे खराब होत आहे. उद्यानात लहान मुले खेळत असतात . भविष्यात चुकून तुटलेल्या लोखंडी बाकड्या मुळे दुखापत होऊ शकते. - बाळकृष्ण खंडागळे - जेष्ठ नागरिक ( शिक्षक)

जे लोखंडी बाकडे गंजलेले आहेत त्याची रंगरंगोटी करण्यात येईल आणि जे तुटलेले आहेत ते बाकडे त्या ठिकाणाहून हटवण्यात येईल तसेच अण्णा हजारे उद्यानातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. - अशोक घोरपडे : मुख्य उद्यान अधिक्षक, पुणे मनपा

loading image
go to top