esakal | जुन्नर नगर पालिकेच्या कोरोना योद्ध्यांची कामगिरी प्रशंसनीय

बोलून बातमी शोधा

corona warriors
जुन्नर नगर पालिकेच्या कोरोना योद्ध्यांची कामगिरी प्रशंसनीय
sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नर शहर व परिसरातील कोरोना बाधित मृतदेहांवर गेल्या वर्षांपासून जुन्नर नगर पालिकेच्या कोरोना योद्धयांकडून अंत्यसंस्कार विधी पार पाडले जात आहेत. कोविड-१९ चा प्रादुर्भाव शहर व परिसरात वाढू नये याची दखल जुन्नर नगर पालिका प्रशासन घेत असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप व आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी सांगितले.

हेही वाचा: जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई

जुन्नर नगर पालिकेच्या अजहर तिरंदाज, रवी चव्हाण, अशोक शिंदे, सचिन गायकवाड, सॅम्युअल कौलेस्कोट, समीर फुलपगार, संतोष रोकडे, मुकादम अब्दुल सय्यद व कृष्णा तळपे या कर्मचाऱ्यांची टीम कोरोना बाधित मृत देहांवर अंत्यसंस्कार करण्याची मोलाची कामगिरी सर्व खबरदारी घेऊन बजावीत आहेत. गेल्या वर्षांपासून सुमारे २७ मृतदेहांवर अंत्य संस्कार करण्यात आले यातील २५ मृतदेहांवर नारायणगाव ग्रामपंचायतीच्या गॅस दाहिनीत दहनविधी करण्यात असला तर दोन मृतदेहांचा दफनविधी करण्यात आला.

मुख्याधिकारी घोलप यांनी प्रभाग निहाय रुग्ण व्यवस्थापनाची कामे कर्मचाऱ्यांना दिली असून वेळोवेळी सर्व कामाचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना ते देत आहेत. गॅस दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी नारायणगावचे सरपंच बाबू पाटे व ग्रामपंचायत प्रशासनाकडून लाभत असलेल्या सहकार्याबद्दल नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सरपंच पाटे व नारायणगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत. शहरातील सर्व नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी योग्य ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष पांडे यांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा: कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय