esakal | पर्मनंट लायसन्सची परीक्षा आता रविवारीही होणार
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पर्मनंट लायसन्सची परीक्षा आता रविवारीही होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पक्के लायसन्स मिळण्यासाठी आता नागरिकांना रविवारीही त्यासाठीची परीक्षा देता येणार आहे. पक्के लायसन्स काढण्यासाठी वाढत असलेली गर्दी लक्षात घेऊन परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या कार्यालयाने याबाबतचा आदेश दिला आहे.

नागरिकांना मोबाईल फोनवरूनही शिकाऊ वाहन परवाना काढता येईल, अशी सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. परिवहन आयुक्त ढाकणे यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) रविवारीही पक्के लायसन्ससाठीची परीक्षा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यात तयारी केली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

पक्के लायसन्स काढण्यासाठी नागरिकांनी www.sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर स्लॉट बुकिंग या विभागावर क्लिक करायचे आहे. त्यात ऑप्शन विभागात पक्के लायसन्स काढण्यासाठी नागरिकांना अपॉइंटमेंट बुक करता येईल.

loading image
go to top