esakal | शांतिरक्षक सोसायटीत ‘कॉलमवर’ थेट तिसरा मजला
sakal

बोलून बातमी शोधा

शांतिरक्षक सोसायटीत ‘कॉलमवर’ थेट तिसरा मजला

शांतिरक्षक सोसायटीत ‘कॉलमवर’ थेट तिसरा मजला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येरवडा: शांतिरक्षक सोसायटीच्या आवारात अनेक सदनिकाधारकांनी त्यांच्या घराशेजारी बेकायदा बांधकामे केली आहेत. येथील इमारतीत तीसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या अेका सभासदाने कॉलम टाकून त्यावर मजला चढविला आहे.

हेही वाचा: गणेश मंडळांना हवी स्थिर ढोल वादन करण्याची परवानगी

महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करू येथे होणाऱ्या अनाधिकृत बांधकामांबाबत संबंधित सदनिकाधारकांना नोटिसा दिल्या असल्याची माहिती सोसायटीचे प्रशासनक हरुण सय्यद यांनी दिली. तर लवकरच सोसायटीतील सर्व अतिक्रमणे काढून टाकणारे असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कश्‍यप वानखेडे यांनी दिली. शांतिरक्षक सहकारी गृहरचना संस्था स.न.१९१/अ येथे तीस इमारती आहेत.

यामध्ये ६२४ सदनिकाधारक आहेत. यापैकी ८८ सभासदांचे सदनिका अद्याप बांधले गेले नाहीत. सोसायटीने सदनिका बांधण्यासाठी महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन दोन कोटी ८० लाख २८ हजार रूपये कर्ज घेतले होते. संस्थेच्या ७/१२ च्या उताऱ्यावर कॉर्पोरेशनच्या कर्जाचा बोजा चढविण्यात आले आहे. शांतिरक्षक सोसायटीने कर्जाची परतफेड न केल्याने कर्जाची रकम नऊ कोटी ७० लाख रूपये झाली असल्याची माहिती हौसिंग फायनान्सचे अरुण आरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे : मिळकत वाटप नियमावलीत होणार सुधारणा

अशा स्थितीत सोसायटीतील इमारत क्रमांक सी-१२ मधील सदनिका क्रमांक १७७ ते १९२ या १६ सदनिकाधारकांनी जागेवर आरसीसी पक्के बांधकाम केले. इमारतीच्या पूर्वेस अंदाजे १५ बाय ६० मापाचे तळ मजल्यासह दाेन मजल्यांचे तर इमारतीच्या पश्‍चिमेस अंदाजे त्याचे मापाचे तळ मजल्यासह तीन मजल्यांचे बांधकाम केले आहे.

यासह अे विंगमधील १,२,३, ४ , बी- विंग मधील १, २,३,४, ७, सी विंग मधील १,२,३, ४, ५, ८,९,१०,१२ तर डी विंग मधील १,२, ३, ४, ५ अशा २४ इमारतींमध्ये बेकायदा बांधकामे केली असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र राऊत, कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे, उपअभियंता राजेश शिंदे यांना वेळोवेळी पत्राने कळविले असल्याचे आरेकर यांनी दिली.

’’ लवकरच पोलिस बंदोबस्तात शांतिरक्षक सोसायटीतील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येईल.’’ -कश्‍यप वानखेड, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका

loading image
go to top