दारुने भरलेला ट्रक उलटला ; दारुच्या बाटल्यांची स्थानिकांकडून लूट

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही
उंडवडी कडेपठार ( ता. बारामती) हद्दीत   दारुने भरलेला माल ट्रक पलटी झाला आहे.
उंडवडी कडेपठार ( ता. बारामती) हद्दीत दारुने भरलेला माल ट्रक पलटी झाला आहे.sakal

बारामती : पाटस रस्त्यावर उंडवडी कडेपठारच्या हद्दीत आज पहाटे साडे चारच्या दरम्यान दारुच्या बाटल्या भरलेला ट्रक पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ही घटना परिसरात समजल्यानंतर लोकांनी दारुच्या बाटल्या पळवून नेहल्या.

याबाबत मिळालेली माहीती अशी , की बारामती - पाटस रस्त्याने माल वाहतूक ट्रक - (एम. एच. 12 एफ. सी. 6150) हा बारामती येथील मॅगडॉल कंपनीतून दारुच्या बाटल्या भरुन जळगाव भुसावळकडे निघाला होता. पहाटे साडे चार वाजता उंडवडी कडेपठारच्या हद्दीत आल्यानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर ट्रक सातवा मैल नजिक एका धाब्याजवळ पलटी झाला. या ट्रकमध्ये चालक आणि त्याचा सहकारी होता. या आपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले.

उंडवडी कडेपठार ( ता. बारामती) हद्दीत   दारुने भरलेला माल ट्रक पलटी झाला आहे.
नांदेड : कारखान्यांची चौकशी राजकीय हेतूने प्रेरित; अशोक चव्हाण

या माल ट्रकमध्ये दारुचे 950 बॉक्स भरलेले होते, याची किंमत जवळपास 65 लाख रुपये असल्याची माहिती ट्रक चालक निलेश गोसावी व त्यांचा सहकारी अंकुश बेंद्रे ( दोघेही रा. बारामती) यांनी दिली.

दारुचा माल ट्रक उलटल्याची माहिती आजुबाजुच्या परिसरात पसरल्यानंतर येथील नागरिकांनी पिशव्या - गुणपाट भतुन दारुच्या बाटल्या पळवून नेहल्या. विशेष म्हणजे दारुच्या पळवून नेहण्यात महिलांसह मुलींनीचाही समावेश होता. या घटनेत आपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेल्या चालक आणि त्याच्या सहका-याला गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत देखील कोणीही केली नाही. सर्वजण दारुच्या बाटल्या भरुन नेहण्यात व्यस्त होते. अगदी सकाळी सात पर्यंत अक्षराक्षा घटनास्थळावर दारु पळविण्यासाठी गर्दी झाली होती. सकाळी सातच्या दरम्यान तालुका पोलिस घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर लोकांकडून सुरु असलेली दारुची लय लूट थांबली.

उंडवडी कडेपठार ( ता. बारामती) हद्दीत   दारुने भरलेला माल ट्रक पलटी झाला आहे.
‘बुलडाणा क्रेडिट’च्या शहागड शाखेवर दरोडा

मद्यपींची चंगळ..

येथील दारुच्या बाटल्या गोळा करुन नेहल्यानंतर दोन तीन जण भल्या सकाळी - सकाळी पिवून रस्त्यावर येवून बडबड करत असल्याचे चित्रही काही वेळातच पाहायला मिळाले. फुकटची दारु मिळाल्यामुळे ऐन दिवाळी नशेतच जाणार असून यामुळे मद्यपींची मोठी चंगळचं झाली आहे. अशी परिसरात चर्चा रंगाताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com