कोरोना मुक्तीसाठी झटतायेत पिसर्वेकर; गावकऱ्यांनी उचलला खर्चाचा भार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना मुक्तीसाठी झटतायेत पिसर्वेकर

कोरोना मुक्तीसाठी झटतायेत पिसर्वेकर

माळशिरस : पिसर्वे गावामध्ये कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडू लागल्यामुळे संपूर्ण गावच कोरोनाच्या विळख्यात सापडते की, काय अशी शंका उपस्थित झाली होती. बाहेर शासकीय कोविड केअर सेंटरला जागा उपलब्ध होत नव्हत्या आणि रुग्ण होम आयसोलेट करणे धोकादायक होत. त्यामुळे पिसर्वे ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन ग्रामपंचायतीचे कोविड सेंटर सुरू केले व याच्या खर्चाचा भार देखील गावकऱ्यांनी उचलला.

गावातील दोन डॅाक्टर विनामोबदला सेवा देतात तर गावकऱ्यांच्यात कोणी रुग्णांची जेवणाची सोय करतेय,कोणी पीपी कीट देतेय तर इतर खर्चासाठी आपल्या परीने शक्य ती अर्थिक मदत देत आहे.तर कोणी गावात औषधे फवारणी आपल्या टंक्टर द्वारे करत आहे. सरपंच बाळासाहेब कोलते यांच्या नेतृत्त्वाखाली गाव कोरोणा मुक्तीसाठी ग्रामस्थांचे चालू असलेले प्रयत्न निश्चितपणे हेवा वाटावे असे आदर्शवत आहे.

हेही वाचा: पुणेकर राजूची अकाली ‘एक्झिट’ धक्का देणारीच !

पुणे ः ‘‘राजू अगदी साधा होता. आई मंत्री असतानाही त्याचा रूबा  पिसर्वे पुरंदर तालुक्यातील एक मोठं आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे गाव आहे. मागील वर्षी कोरोनाला थोपवून धरणाऱ्या या गावात यावर्षी लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना रुग्णसंख्येने शतक गाठलं आणि मग घाबरून बाहेर कोविड सेंटरला लोकांना पाठवायला सुरुवात झाली. पण तिथेही जागा मिळेनाशी झाली आणि पिसर्वेकरांनी निर्णय घेतला गावकऱ्यांसाठी गावातच लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून कोविड सेंटर व विलगीकरण केंद्र सुरू करायचे. कोरोना संसर्गित कमी तीव्रतेचे रूग्ण येथे थांबवून त्यांच्यावर उपचार करायचे.

सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र सोशल मीडियाचा वापर करीत सरपंच बाळासाहेब कोलते यांनी गावकऱ्यांना आवाहन केले आणि मदतीचा ओघ सूरु झाला. आर्थिक, वस्तू आणि अन्नसेवेची मदत पोहचू लागली. कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा शासकीय यंत्रणेचे सहकार्य न घेता कक्ष सुरु झाला ,हे केंद्र सुरू होताना बेडचा विचार नव्हता. मात्र सरपंचांच्या आवाहनानंतर गावातील नागरिकांनी २७ खाटा उपलब्ध करून दिल्या. त्यावर गाद्या टाकायला पैशांची जुळवाजुळव सुरू असतानाच लक्ष्मण मारुती हेंद्रे व माजी सरपंच संभाजी कोलते यांनी प्रत्येकी पाच हजारांची मदत केली. गावात खाजगी रूग्णालय चालवणारे विलास सूर्यवंशी, देविदास नवले हे डॅाक्टर विनामोबदला रुग्णांना वर तपासणी करून कोविड सेंटर मध्ये औषध उपचार करत आहेत. येथील नवमहाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कै. राजेश नायडू या मित्राच्या स्मरणार्थ रुग्णांना गरम पाणी मिळावे यासाठी ब्लू स्टारचे मशिन बसवून दिले तर अनिल संपत कोलते यांनी रुग्णांना वीस वाफेची मशीन उपलब्ध करून दिली. सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी कैलास अश्रू व सुभाष किसन कोलते या बंधूनी आपल्या खांद्यावर घेतली. योगेश प्रमोद कोलते या युवकाने दररोज रात्रीचे जेवण पुरवले आहे. मुंबईचे व्यापारी सतिश हरिश्चंद्र कोकणे यांनी दोन वेळच्या जेवणासाठी निधी उपलब्ध करू दिला आहे तर, विजयदादा युवा मंचाचे कार्याध्यक्ष शिवाजी एकनाथ कोलते यांनी ड्रायफ्रूटस, फळे, आवश्यक पिपि किट,काडा बनवण्याकरीता साहित्य आदी गोष्टीं या कोविड केंद्रास उपलब्ध करून दिली. यांच्याव्यतिरिक्त अनेक सर्वसामान्य लोकांनी पाचशे रुपयांपासून ते अकरा हजार रुपयांपर्यंत आर्थिक देणगी दिली आहे. महिंद्रा कोलते यांनी आपला टक्टर गावात औषध फवारण्या करता मोफत दिला. वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील तरून इतर खर्चाएवजी कोविड सेंटर ला मदत करत आहेत.

हेही वाचा: पुणे महापालिका करणार २० टन ऑक्सिजनची निर्मिती

याबाबत बोलताना सरपंच बाळासाहेब कोलते म्हणाले की, ''खरे तर ग्रामपंचायतीच्या खर्चाने हे केंद्र चालविण्याचा प्रयत्न होता. परंतु लोकांनीच लोकसहभाग एवढा दाखवला की ग्रामपंचायतीला खर्चच करावा लागला नाही. त्याचबरोबर कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्यांसमोर देखील मदतीची अपेक्षा व्यक्त करावी लागली नाही.या संपूर्ण उपक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य, कोरोना संनियंत्रण समितीसह सदस्य चंद्रकांत कोलते, सुनील कोलते, महेश वाघमारे, स्वयंसेवक नवनाथ कटके, तेजस कोलते, नितिन कोलते, शामराव वायकर, विट्ठल कोलते,संदीप बनसोडे याचं मोलाच सहकार्य लाभले असल्याने हा उपक्रम यशस्वी करता आल्याच बाळासाहेब कोलते यांनी सांगितले.''