बुलेटचे चाक पायावरुन गेल्याने धनकवडीत तरुणासह कुटूंबास मारहाण

बुलेटचे चाक पायावरुन गेल्याने धनकवडीत तरुणासह कुटूंबास मारहाण

पुणे : बुलेटचा चाक पायावरुन गेल्याने एका तरुणासह त्याच्या कुटूंबास जबर मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर तरुणावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास धनकवडीतील तानाजीनगर येथे घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक करून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल ऊर्फ बाळा दिपक कदम (वय 28, रा. गुलाबनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष हजारे (वय 29, रा.तानाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

बुलेटचे चाक पायावरुन गेल्याने धनकवडीत तरुणासह कुटूंबास मारहाण
पुण्यात नमाजसाठी मशिदीत एकत्र येण्यावर निर्बंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हजारे हे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बुलेटवरून धनकवडीतील तानाजीनगर येथून जात होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या स्वप्निल कदमच्या पायावरुन फिर्यादीची बुलेट गाडी गेली. त्याचा राग मनात धरून स्वप्नील आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीस शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. त्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता स्वप्नील व त्याचे साथीदार फिर्यादीकडे गेले. तेथे जाऊन त्यांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. त्यावेळी फिर्यादीसमवेत असणाऱ्या त्यांचा मित्र अरबाज बागवान यालाही मारहाण केली. केवळ तेवढ्यावरच ना थांबता आरोपींनी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या स्वप्निलचा भाऊ, पत्नी व आईलाही आरोपींनी जबर मारहाण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com