पुण्यात नमाजसाठी मशिदीत एकत्र येण्यावर निर्बंध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन
Ramadan Namaz
Ramadan NamazGoogle

पुणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण आणि इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी (ता. १७) आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेच्या नियमांचे (मास्क व सॅनिटायझर ) पालन करून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करावा.

Ramadan Namaz
कोरोनामुळे माजी मुख्यमंत्र्यांचेही हाल; उपचारासाठी मिळेना बेड

या महिन्यात मुस्लिम बांधव ३० दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात आणि संध्याकाळी मगरीब नमाजपूर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ, अन्नपदार्थ विक्रेते या ठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी संबंधित प्रभागाचे सहायक महापालिका आयुक्त आणि पोलिस प्रशासन यांनी योग्य उपाययोजना करावी. रमजान महिन्यात शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण करण्याची प्रथा आहे. परंतु या वेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरिता एकत्र जमू नये. आपापल्या घरातच दुवा पठण करावे.

Ramadan Namaz
कोरोना फोफावतोय! २४ तासात आढळले २.६१ लाख नवे रुग्ण

शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्यात २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लिम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण आणि नमाज अदा करतात. परंतु यावर्षी मुस्लिम बांधवांनी सर्व धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे करावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

- महापालिका क्षेत्रात कलम १४४ (संचारबंदी) लागू असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत.

- नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

- कोणत्याही मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी

- मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

- मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com