पुणे : मालकाचेच चोरले ३० तोळे सोन्याचे कडे; आरोपीस अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मांजरी येथे मालकाचा विश्वास संपादन करून ३० तोळे वजनाचे सोन्याचे कडे चोरी करणा-या नोकराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव किरण अशोक गायकवाड (वय २२, रा. कानिफनाथ सोसायटी, शेवाळेवाडी ) असे आहे. याबाबत मांजरीतील एका प्रतिष्ठीत ज्येष्ठ नागरिकांने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पुणे : मांजरी येथे मालकाचा विश्वास संपादन करून ३० तोळे वजनाचे सोन्याचे कडे चोरी करणा-या नोकराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव किरण अशोक गायकवाड (वय २२, रा. कानिफनाथ सोसायटी, शेवाळेवाडी ) असे आहे. याबाबत मांजरीतील एका प्रतिष्ठीत ज्येष्ठ नागरिकांने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रघूनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हा फिर्यादीच्या घरी गेल्या तीन वर्षांपासून फिर्यादीच्या घरी कामाला होता. फिर्यादी रात्री झोपताना  सोन्याचे कडे गादीखाली ठेवत होते. त्यावर पाळत ठेवून आरोपीने सोन्याचे क़डे चोरले.

INDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय

कडे चोरीला गेल्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास करून आरोपीला अटक करून त्याच्याकडून सोन्याचे कडे जप्त केले. पोलिस निरिक्षक हमराज कुंभार, सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलिस निरिक्षक युसुफ पठाण, संपत औचरे, राजेश नवले, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, गणेश दळवी, गोविंद चिवळे, नितीन मुंढे, शाहिद शेख, अकबर शेख, शशिकांच नाळे, विजय पवार यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेवून तपास केला असता आरोपीने गुन्हयाची कबुली दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft of 300 gram gold accused arrested in Pune Manjari

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: