पुण्यातील सॉफ्टवेअर कंपनीच्या 70 लाखाच्या नेटवर्कींग साहित्याची चोरी; 24 तासात आरोपींना बेड्या 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

संबंधीत कंपनीने त्यांच्या नेटवर्कींग केबलींगचे काम एका दुसऱ्या कंपनीला दिले होते. त्या कंपनीसाठी आरोपी डोलारे हा केबल टाकायचे काम करत होते. तर चौहानने त्याच्याशी संपर्क साधून केबल विकायच्या असतील तर घेऊ असे सांगितले होते.

पुणे ः कल्याणीनगर येथील नामांकीत सॉफ्टवेअर कंपनीतील 70 लाख रुपये किंमतीच्या नेटवर्कींग साहित्याची चोरट्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चोरट्यांना 24 तासात बेड्या ठोकल्या. चोरी केलेला माल चोरट्यांनी मुंबईमध्ये विकला असून माल खरेदी करणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली. तर चोरी प्रकरणी गणेश धोंडीराम डोलरे (वय 31, रा.नऱ्हे), कुलदीप रामचरण चौहान (वय 33, रा.खेरवडा, बांद्रा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत

. याप्रकरणी याप्रकरणी मकरंद बेलुलकर (रा.कात्रज) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथे एच.एस.बी.सी. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंडिया प्रा.लि. नावाची सॉफ्टवेअर कंपनी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधीत कंपनीने त्यांच्या नेटवर्कींग केबलींगचे काम एका दुसऱ्या कंपनीला दिले होते. त्या कंपनीसाठी आरोपी डोलारे हा केबल टाकायचे काम करत होते. तर चौहानने त्याच्याशी संपर्क साधून केबल विकायच्या असतील तर घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार सप्टेंबर 2020 पासून आरोपी संधी मिळेल, त्याप्रमाणे केबलचा एक एक बॉक्‍स कंपनीबाहेर आणून चौहानच्या ताब्यात देत होता. हे बॉक्‍स घेण्यासाठी चौहान मुंबईवरुन येत होता. कंपनीने या प्रकरणाची तपासणी केली, त्यावेळी त्यांना कंपनीचे केबल चोरीला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कंपनीचे अधिकारी बेलूरकर यांनी फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयावरुन डोलारे यास ताब्यात घेतले होते. त्याने कंपनीतील अॅक्‍सेस पॉईंट व अॅक्‍सेस स्विच चोरल्याची कबुली दिली. त्याने हे साहित्य बांद्रयातील कुलदीप चौहानला विकल्याचे सांगितल्यावर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. चौहानकडून 52 लाख 50 हजाराचे नेटवर्कींगचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
कोकणात पावसाची एन्ट्री; बागायतदार चिंतेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of 70 lakh networking materials of software company Pune