

Pune Police Investigate Alleged Robbery At Pooja Khedkar Home
Esakal
पुणे, ता. ११ : वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या औंध परिसरातील बंगल्यात मध्यरात्री चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्याने पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांसह नोकरचाकर यांना बेशुद्ध करून बंगल्यातून दागिने लुटून नेले. याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.