esakal | खेड : भांबोलीत स्फोट करून एटीएमवर डल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

खेड : भांबोलीत स्फोट करून एटीएमवर डल्ला

खेड : भांबोलीत स्फोट करून एटीएमवर डल्ला

sakal_logo
By
शरयू काकडे

आंबेठाण : भांबोली(ता.खेड) येथे हिताची कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी स्फोट करून फोडले असून नेमकी किती रक्कम चोरीला गेली? याची अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु स्फोटानंतर काही रक्कम आजूबाजूला विखुरली गेली असून काही रक्कम मशी मध्ये सुरक्षित आहे. भर वर्दळीच्या रस्त्यालगत चोरीचा असा नवीन प्रकार घडल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोन मध्ये भांबोली गाव आहे.येथे सोमनाथ पिंजण यांच्या मालकीच्या जागेत चाकण-वासुली फाटा रस्त्यालगत हिताची कंपनीचे एटीएम आहे. आज(दि.२१) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हेही वाचा: बॉम्ब ब्लास्ट करून लूट करण्यात आली; पाहा व्हिडिओ

गाळा मालक सोमनाथ पिंजण यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ''रात्रीच्या वेळी गॅस सिलेंडरच्या स्फोटासारखा मोठा आवाज झाला त्यामुळे मी बाहेर आलो असता अज्ञात दोन ते तीन इसम येथे होते. मला पाहता त्यांनी 'इसको पेहले गोली मारो' असे ओरडले. मी एकटा असल्याने घाबरून घराकडे पळालो. त्यानंतर गावचे पोलिस पाटील आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.''

चाकण एमआयडीसी भागात नेहमी लहानमोठ्या चोऱ्या होत असता परंतु अशा प्रकारे स्फोट घडवून चोरी होण्याची पहिलीच घटना आहे.

loading image