मुळा नदीच्या पुलावरील 'फ्लड सेंसर'ची चोरी

सकाळी वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पुणे : नदीने धोक्‍याची पातळी ओलांडणार असल्याची पूर्वकल्पना देणारे 'फ्लड सेन्सर' चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मुळा नदीवरील विश्रांतवाडी-खडकी टँक रस्त्याला जोडणाऱ्या पुलावर घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आमोल भालेराव (वय26 , रा. सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेराव हे सहा महिन्यांपासून महापालिकेने नियुक्त केलेल्या कंपनीत फिल्ड टेक्‍निशयन म्हणून काम करत आहेत. मुळा मुठा नदीवर ज्या ठिकाणी पुल आहेत तेथे पुर स्थितीची माहिती देण्यासाठी 'फ्लड सेन्सर' बसविले आहेत. या कंपनीकडून याची पहाणी केली जाते.

विश्रांतवाडी व खडकी टँक रस्त्याला जोडणाऱ्या पुलाच्या कठड्याला जुलै कंपनीने फ्लड सेन्सर बसविले होते. त्याची किंमत सुमारे 87 हजार रुपये इतकी आहे. भालेराव यांनी केलेल्या पहाणीत हे सेंन्सर चोरीला गेल्याचे समोर आले. पुढील तपास पोलिस करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of flood sensors on Mula river bridge