धक्कादायक! वारजेतील एकाच सोसायटीतील चार फ्लॅटमध्ये चोरी

Theft in four flats in Sai Sayaji Nagar Society in Warje Pune
Theft in four flats in Sai Sayaji Nagar Society in Warje Pune
Updated on

पुणे : वारजे भागातील साई सयाजीनगर सोसायटीत चार फ्लॅटमध्ये मंगळवारी रात्री चोरी झाली. रात्री दोन ते साडेतीन दरम्यान चोरट्यांनी सोने, टीव्ही, लॅपटॉप आणि दुचाकी असा 82 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत सचिन शिर्के (वय ,रा. साई सयाजीनगर, वारजे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

साई सयाजीनगर सोसायटीत मध्यरात्री शिरलेल्या चोरट्यांनी शिर्के यांच्या सदनिकेचे कुलूप तोडले. शिर्के यांच्या सदनिकेतून 30 हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. याच सोसायटीतील रहिवासी महादेव कदम यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून 12 हजारांचा लॅपटॉप तसेच रहिवासी अनिल कदम यांच्या सदनिकेतून 10 हजार रुपये किमतीचा टीव्ही लांबविण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोसायटीच्या आवारातील दुसऱ्या इमारतीतील रहिवासी प्रथमेश करंबळे यांच्या सदनिकेचे कुलूप तोडण्यात आले. चोरट्यांनी करंबळे यांच्या दुचाकीची चावी चोरली. त्यानंतर सोसायटीच्या आवारात दुचाकी पार्क केलेली त्याची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरेचे चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम या चोरीचा तपास करीत आहेत. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोसायटीच्या आवारातील बंद सदनिकांची पाहणी करून चोरटे सदनिकांतून ऐवज लांबवित आहेत.
विद्यार्थ्यांनो, आता पाच वेळा करता येणार एमसीक्यूचा सराव!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com